शैक्षणिक मूल्यमापन

शैक्षणिक मूल्यमापन

घटक1:१.अभ्यासक्रमाची संकल्पना

१.अभ्यासक्रमाची संकल्पना :
१.अभ्यासक्रमासाठी जो शब्द वापरला जातो तो शब्द curriculum या शब्दापासून बनला आहे.त्याची उत्पत्ती लाटिन भाषेत कुरेर या शब्दापासून झाली त्याचा अर्थ होतो घोड्याच्या धावण्याचे शर्यतीचे मैदान.
मग अभ्यासक्रम सुध्दा एक धावण्याचे मैदान आहे.ज्यावर व्यक्ति शिक्षणाचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पळते.
२.शिक्षणाचे साधन म्हणून अभ्यासक्रमाकडे पहले जाते.म्हणून संपूर्ण शालेय जीवन म्हणजे अभ्यासक्रम होय.
३.फ्रोबेल : अभ्यासक्रमाला मानवजातीच्या संपूर्ण ज्ञानाचे व अनुभवाचे सर समजायला पाहिजे.
४.सर पर्सिनन : केवळ ज्ञान किंवा माहिती देणे म्हणजे शिक्षण नव्हे तर समाजात कसे वागावे याचे ज्ञान विद्यार्थांना शाळेतून मिळावे .
५.मनरो : curriculum aim bodies for utilized to attain the aim of education .
६.माध्यमिक शिक्षण : अभ्यासक्रम केवळ रूढ पध्दतीने शिकवले जाणारे विषय नव्हे तर संपूर्ण प्रकारच्या अनुभवाचा त्यात अंतर्भाव असावा.
७.शाळेच्या मार्गदर्शना खाली विद्यार्थांना द्यावयाचे सुनियोजित अनुभव म्हणजे अभ्यासक्रम होय.
८.शालेय व सहशालेय प्रसंगातून अपेक्षित वर्तन बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नाची समग्रता म्हणजे अभ्यासक्रम .
९.शिक्षकांने निर्विकारपणे विद्यार्थांना सुसंस्कृत बनवण्यासाठी आखलेला धावपट म्हणजे अभ्यासक्रम होय.
१०.अभ्यासक्रमाचे उद्दिष्टे आहे ,दर्जेदार मनुष्यबळाची निर्मिती.

२.अभ्यासक्रम घटक:
१.उद्दिष्टे: शिक्षणातून काय साध्य करायचे.
२.आशय: त्यासाठी विविध विषयाची निवड .
३.शैक्षणिक अनुभव: विद्यार्थांचे वय,आवडी निवडी .
४.मूल्यमापन : उद्दिष्टे किती प्राप्त झाली.

३.पाठ्यक्रम व स्वरूप व वैशिष्टे:
पाठ्यक्रम: शिक्षकांने त्या अभ्यासक्रमा अंतर्गत केलेल्या प्रत्येक विषयाची क्रमबद्ध आखणी म्हणजे पाठ्यक्रम .
पाठ्यक्रम स्वरूप : विषय व विषयाखाली दिलेले घटक –उपघटक व मुद्दे व उपमुद्द्याचा तपशील म्हणजे पाठ्यक्रम .
पाठ्यक्रमाचे वैशिष्टे:
१.अभ्यासक्रमाची उद्दिष्टे.
२.घटक –उप घटकाचा तपशील.
३.मुद्दे-उप मुद्दे यांच्या तपशील .
४.विद्यार्थांचे वर्तनबदलाचे स्वरूप.
५.पाठ्यक्रमातील उपक्रमाची व अध्ययन अनुभवाची सूची.

४.अभ्यासक्रम व पाठ्यक्रम फरक :
१.अभ्यासक्रम व्यापक आहे. व पाठ्यक्रम मर्यादीत असून ते अभ्यासक्रमाचे अंग आहे.
२.अभ्यासक्रम हा लवचिक आहे. व पाठ्यक्रम हा ताठर आहे.
३.अभ्यासक्रम हा व्यक्तिविकासावर केंद्रीत आहे.व पाठ्यक्रम विषयज्ञानाच्या विकासावर केंद्रीत आहे.
४.अभ्यासक्रम हा शाळा व समाज यांच्याशी संबंधीत आहे. व पाठ्यक्रम हा विद्यार्थांच्या विषयज्ञानाच्या विकासाशी संबंधित आहे.
५.अभ्यासक्रमाचे तत्व शैक्षणिक ज्ञानाशी संबंधित आहे. व पाठ्यक्रमाचा संबंध हा व्यावहारिक ज्ञानाशी संबंध आहे.
६.अभ्यासक्रमात अनेक विषय आहे. व पाठ्यक्रमात एकच विषय आहे.

५.अभ्यासक्रम विकसन व अभ्यासक्रमाची निर्मिती रचना करतांना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी :
अभ्यासक्रम विकसन : अभ्यासक्रम विकसन ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे म्हणून अभ्यासक्रमात क्रमबद्धतेला फार महत्व आहे. कारण शैक्षणिक ध्येय पूर्ण करण्यासाठी अभ्यासक्रम असतो.
अभ्यासक्रमाची निर्मिती रचना करतांना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी :
१.अभ्यासक्रमाची उद्दिष्टे निश्चित करणे.
२.विषयानुसार अध्ययन अनुभव व आशय निश्चित करणे.
३.विषयाची उद्दिष्टे निश्चित करणे.
४.उद्दिष्टानुसार अभ्यासक्रमाची निवड करणे .
५.प्रत्याभरण.

६.अभ्यासक्रम रचनेचे तत्वे:
१.उपयुक्तता : सुखी व समृध्द जीवन जगण्याची पात्रता व आर्थिक स्वालंबन म्हणजे उपयुक्तता.उपयुक्तताचा विचार व्यक्तिहिताच्या दृष्टीने ,समाजहिताच्या दृष्टीने ,राष्ट्रहीताच्या दृष्टीने होणे आवश्यक आहे.
देशाच्यातील समस्या सोडवण्याचे सामर्थ्य विद्यार्थांमध्ये येण्यासाठी अभ्यासक्रम उपयुक्त असावा, शिक्षणातून उत्पादन क्षमता हे राष्ट्रीय उद्दिष्टे आहे.

२.विविधतता: विविधताचा विचार विषयाच्या दृष्टीने ,कृतीच्या दृष्टीने ,उपक्रमाच्या दृष्टीने असावा.
शिक्षणाचे सार्वत्रीकरण करण्यासाठी विविधतेचे तत्व अभ्यासक्रमात असणे आवश्यक आहे. म्हणून गरजा व परिसर ह्यांना अनुरूप व्यावसायिक अभ्यासक्रमाची आखणी करावी व त्यात विविधता असावी.

३.लवचिकता: स्थल ,काल,.परिस्थिती व समाज –जीवन याच्या नुसार अभ्यासक्रमात बदल करण्याची तरतूद म्हणजे लवचिकता .
विविधता व लवचिकता ही व्याक्तीभिन्नतेच्या तरतुदीसाठी असतात.
४.वैयक्तीकता: सबघोडे १२ टक्के म्हणून चालणार नाही.म्हणून विद्यार्थांच्या आवडीनुसार अभ्यासक्रम असावा म्हणजे प्रत्येकासाठी वेगळा अभ्यासक्रम असा नाही तर विद्यार्थांच्या गुणांना व अभिरुचींना पोषक अभ्यासक्रम .
५.तत्परता: शरीराच्या व मनाच्या अनुकूल अवस्थेला तत्परता म्हणतात.अभ्यासपूरक कार्यक्रमाची योजना व विकासाच्या अवस्था लक्षात घेणे.वैयक्तिक व तत्परता यातून मानसशास्त्रीय अधिष्ठान हे तत्व आले.
६.प्रभुत्व संपादन : (डॉ .बेंजामिनब्ल्यम)
वर्गातील ९५ टक्के विद्यार्थांचे अध्ययन विशिष्टे उद्दिष्टाच्या संदर्भात वर्तन परिवर्तन म्हणजे प्रभुत्व संपादन . प्रभुत्व संपादनामुळे बौद्धिक विकास मदत होते.
१.विशिष्ट अध्ययनासाठी विद्यार्थांची अभियोगता.
२.अध्यापनाचा दर्जा .
३.अध्ययन समजण्याची क्षमता.
४.अध्यानातील चिकाटी.
५.विद्यार्थांना अध्ययनास दिला जाणारा वेळ.

२.क्षमताची संकल्पना

१.क्षमता व त्याचे प्रकार :
क्षमता:
१.व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या सुप्त शक्ती म्हणजे होय.
२.क्षमता म्हणजे धारणा करण्याची शक्ती.
३.क्षमता विकास करणे म्हणजे शिक्षण होय.
क्षमताचे प्रकार :
१.ज्ञानाधारित क्षमता: ज्ञान,बौद्धिक,कौशल्याचे वर्णन .
२.कार्यमान -आधारित क्षमता:ज्ञानाचे उपयोग करणे.
३.परिणाम आधारित क्षमता: एखाद्या कृतीतून चांगला परिणाम.
४.भावनात्मक क्षमता: कोणाच्या अंगी कोणती मूल्य वृत्ती.
किमान अध्ययन क्षमताचा विचार करतांना अध्ययनाच्या हेतूंची निश्चिती करणे आवश्यक.

२.क्षमाताधिष्टीत अभ्यासक्रम व तो तयार करतांना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी:
क्षमाताधिष्टीत अभ्यासक्रम: क्षमता केंद्रभूत मानून तयार झालेल्या अभ्यासक्रमास क्षमाताधिष्टीत अभ्यासक्रम म्हणतात.
१.क्षमताची निश्चिती करणे.
२.प्रत्येक क्षमतेत अंतर्भूत असलेल्या उपंगांचे विश्लेषण.
३.उपंगांच्या क्रमांची निश्चित .
४.प्रत्येक उपंगाच्या श्रेणी बध्द विकासासाठी अनुभूतीची योजना केली असते.
५.ही श्रेणी बद्धती उद्दिष्टानुसार केली असते.
६.म्हणून विद्यार्थांच्या क्षमताचा विकास योग्य टप्पाने होणार आहे.
७.विद्यार्थांच्या क्षमताचा विकास योग्य टप्पाने होणार आहे.
८.विद्यार्थांच्या क्षमताची अंगे :- शारीरिक,बौद्धिक ,भावनिक कायीक ,सामाजिक ,धार्मिक ,नैतीक.

३.क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमात शिक्षकांची भूमिका :
१.निरीक्षीण क्षमता.
२.तज्ञ मार्गदर्शक .
३.सहभागी नेता.
४.सहकारी मित्र.
५.तत्वचिंतन .
६.मूल्यमापन करणारा.
७.व्यक्तिमहत्व विकास हा अभ्यासक्रमाचा केंद्र बिंदू आहे.

४.क्षमताधिष्टीत अभ्यासक्रमाचे वैशिष्टे :
१.जीनाभिमुखता: जीवन यशस्वी जगण्याचे सामर्थ्य होय.
२.व्यापकता: क्षमताधिष्टीत अभ्यासक्रम हा जीवनच्या समग्रदृष्टिकोनावर आधारलेला आहे.
३.विविधता: क्षमताधिष्टीत अभ्यासक्रम विविध क्षमताच्या विकासाठी आवश्यक आहे.
मानसशास्त्रीय अधिष्ठान: हे तत्व वैयक्तिक व तत्परता या तत्वातून घेतले आहे.

५.क्षमाताधिष्टीत अभ्यासक्रमाच्या मर्यादा:
१.मानवीक्षमताचे विश्लेषण करणे अवघड .
२.कौशल्याचे काम.
३.प्रभावी शिक्षकाची कमतरता.

६.इयत्ता १ ते ५ वी निम्न प्राथमिक स्तरावर विविध विषयाच्या विविध क्षमता:
१.मातृभाषेच्या क्षमता: श्रवण,भाषण,वाचन,लेखन.
२.गणिताची क्षमता: संख्याज्ञान,बिजगणित.
३.हिंदी : श्रवण,भाषण,पठण,लेखन.
४.इंग्रजी: श्रवण,भाषण,पठण,लेखन.
५.सामान्यविज्ञानाच्या क्षमता:
६.परिसर अभ्यासाच्या क्षमता: निसर्गाचे निरीक्षण.
७.भूगोलाच्या क्षमता: अकक्षांस,रेखांक्ष,लोकसंख्या.पर्वताची उंची,कारखाने,हवामान,तापमान.
८.इतिहासाचा व नागरिक शास्त्राच्या क्षमता:
९.कार्यानुभव क्षमता:

३.अध्यापनाचे स्वरूप व अध्यापनाचे नवीन तंत्रे

१.अध्ययन-अध्यापन यांचा परस्पर संबंध :
१.अध्ययन विद्यार्थी करतात. व अध्यापन शिक्षक करतात.
२.अध्ययनाने विद्यार्थांचा विकास होतो. व अध्यापन हे अध्ययनास अनुकूल वातावरणाची निर्मिती करते.
३.अध्ययनाने विद्यार्थात वर्तन बदल घडवून येतो . व शेफलर :विद्यार्थात वर्तन बदल घडून आणण्यासाठी शिक्षकाने केलेली कृती म्हणजे अध्यापन होय.
४.अध्ययन करण्यास ज्ञानेंद्रिये कार्यक्षम असावी लागता. व अध्यापन परिणामकारक होण्यासाठी शिक्षकांला मानसशास्त्रीय व शिक्षणशास्त्र यांचा अभ्यास हवा आहे.
५.अध्ययन –अध्यापन ही एक तर्फी प्रक्रिया नाही ती व्दिकेंद्रात्म्क प्रक्रिया आहे. व अध्ययन –अध्यापन यास समाज घटक जॉनड्युई याने जोडला म्हणून ती त्रिधुवात्मक प्रक्रिया झाली.

२.शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया :
१.शिक्षक – फलक-शैक्षणिक साधन.
२.विद्यार्थी –विद्यार्थी-विद्यार्थी –विद्यार्थी.

३.अध्यापन कौशल्य व अध्यापनात प्रमुख कोणत्या अध्यापन कौशल्याचा वापर केला जातो:
१.वर्ग व्यवस्थापन कौशल्य.

२.संप्रेषण कौशल्य.
१.कथन कौशल्य.
२.स्पष्टीकरण कौशल्य.
३.उदाराहरण व दाखले कौशल्य.
४.वर्णन कौशल्य.
५.अभिनय कौशल्य.
६.समारोप कौशल्य.

३.आंतरक्रियाविषयक कौशल्य.
१.प्रश्न कौशल्य.
२.चेतक कौशल्य.
३.प्रबलंन कौशल्य.
४.शैक्षणिकसाधन वापरण्याचे कौशल्य.
५.फलक लेखन कौशल्य.
६.अभिवृतीच्या व वर्तनाच्या विकासाशी संबंधित कौशल्य.
७.दिग्दर्शन कौशल्य.

१.वर्ग व्यवस्थापन कौशल्य:
१.वर्गाची मांडणी व त्याची रचना ,शिस्त,संघटन,योजकत्व,मितव्य.
२.वर्गातील सगळ्या गोष्टीची रचना.
३.दंगाकरणारे व शिस्त मोडून पाहणाऱ्या विद्यार्थांकडे शिक्षकांचे लक्ष.
४.अध्यायनास अनुकूल वातावरण निर्मिती.
५.वर्गात वर्ग मंत्री व वर्ग प्रमुख नेमने.

२.संप्रेष्ण कौशल्य :आपल्या मनातील विचार विद्यार्थां पर्यंत पोहोचविणे यास संप्रेषण म्हणतात.
१.कथन कौशल्य:

१.कथनाचा प्रारंभ व शेवट.
२.आवाजात चढ-उतार व गती.
३.मुद्यांची मांडणी व उदाहरणे व दाखले यांचा वापर.
४.मुद्यांची सुसूत्रता –क्रमबद्धता व सुयोग रचना.
५.कथन कौशल्य : घटन,इतिहास,चारित्र्य,कथा.
६.प्रश्न विचारणे व फलक लेखनाचा वापर .
७. कथनाचा वेग.

२.स्पष्टीकरण कौशल्य:
१.स्पष्टीकरण करतांना त्यातील दुवे.
२.दृक-श्राव्य साधनाचा वापर.
३.योजना पूर्वक पुर्नावृती .
४.योग्य शब्द व योग्य रचना व योग्य उदाहरणे.
५.प्रारंभिक व अंतिम विधाने.
६.कथनातील ओघवतेपणा .
७.मुद्यांची सुसूत्रता.

३.उदाहरणे व दाखले कौशल्य:
१.विद्यार्थांच्या वयानुरूप.
२.पाठ्यघटकाला पूरक.
३.विद्यार्थांचे अवधान खेचणारी .
४.उदाहरणे व दाखल्यातील विविधता.
५.विद्यार्थांचा उदाहरणे व दाखल्यात सहभाग.
६.उदाहरणे व दाखल्याची संख्या.
७.योग्य उदाहरणे व समर्पक दाखले देणे.

४.वर्णन कौशल्य:
१.विषयानुकुल वर्णन विषयाची निवड.
२.सरळ सुटसुटीत भाषेचा वापर.
३.वर्णनातील ठाशीवपणा .
४.वस्तूचे प्रसंगांचे जिवंतमय चित्रण .
५.वायनुसास भाषेचा वापर.
६.योग्य शब्दाची निवड.

५.अभिनय कौशल्य:
१.विद्यार्थाच्या समोर प्रसंगाचे चित्र उभे राहण्यासाठी अभिनय करणे.
२.विद्यार्थांचे लक्ष प्रसंगाशी एकरूप करणे.
३.आपले विचार विद्यार्थांन पर्यंत पोहचविण्याचे अभिनय एक तंत्र आहे.
४.शिक्षकाची भुमिका एका नटाची आहे.

६.समारोप कौशल्य:
१.पाठची सुरुवात प्रस्तावनेने तर पाठाचा शेवट समारोप कौशल्याने करतात.
२.समारोपामध्ये संकलन व उपयोजन घेतात.
३.समारोप हा अध्यापनाचा गाभा आहे.
४. शिक्षक व विद्यार्थांकडून पाठ्यामुद्याचे एकत्रीकरण.

३.आंतक्रिया विषय कौशल्य:
शिक्षक व विद्यार्थी यामध्ये घडवून येणारे क्रिया म्हणजे आंतक्रिया होय.

१.प्रश्न कौशल्य :
१.प्रश्नाची शब्द रचना मोजके शब्द व निसंग्दीग्द प्रश्न.
२.शिक्षकाचा आवाज,गती,अस्खालीतपणा.
३.विद्यार्थांना विचार करण्यास योग्य आवधी.
४.वर्गातील सर्व विद्यार्थांना समान संधी .
५.उच्च स्तरीय व निम्न स्तरीय प्रश्न .
६.प्रश्नांची व उत्तराची पुनरावृत्ती टाळणे.
७.प्रश्नाच्या उत्तराला योग्य प्रबलन देणे.

२.चेतक बदल कौशल्य:
१.शिक्षकांची हालचाल.
२.शिक्षकांचा आवाज व अस्खालीतपणा.
३.संवेदन लक्षात बदल.
४.बोलण्याच्या पध्दतीत बदल.
५.विद्यार्थांचा शाब्दिक व कृतियुक्त सहभाग.

३.प्रबलंन कौशल्य:
१.शाब्दिक प्रबलंन :-वा ! वा ! किती छान !
२.अशाब्दिक प्रबलंन: पाठ थोपटणे ,मन डोलावणे.
३.ऋण प्रबलंन : टिंगल करणे ,टोचून बोलणे.

४.शैक्षणिक साधन वापरण्याचे कौशल्य :
१.विषयाच्या उद्दिष्टास अनरूप.
२.विद्यार्थांत इष्ट प्रवृत्ती निर्माण करणारे.
३.विषयांशी सुसंगत.
४.विद्यार्थांना पाठात सहभागी होण्यासाठी.
५.शैक्षणिक साधन अद्यावत व चांगल्या स्थितीत असावे.
६.विद्यार्थांच्या वयोगटाला व पातळीला मानणारे .
७.अमूर्त कल्पना मूर्त करण्यासाठी वापर.

५.फलक लेखन कौशल्य:
१.लेखनातील स्पष्टता वळण व आकार.
२.दोन शब्द व अक्षर यातील समान अंतर .
३.लेखनातील शुध्दता व लेखनाची गती.
४.लेखन नियोजन फलकांचे दोन समान भाग करणे.
५.लेखनातील मुद्याची गुंपण .
६.लेखनातील आटोपशीरपणा .
७.फलक लेखनाचा अवधानासाठी वापर.

६.अभिवृत्तीच्या व वर्तनाच्या विकासाशी संबंधित कौशल्य:
१.नेमलेल्या अभ्यासक्रमाच्या अध्यापना द्वारे .
२.सांस्कृतिक उपक्रमाच्या योजनेद्वारे .
३.परिसर विकासाच्या कार्यक्रमातून .
४.स्वयं प्रेरणात्मक उपक्रमाद्वारे.

७.दिग्दर्शन कौशल्य:
१.साहित्याची निवड व वाटप.
२.साहित्याची मांडणी व काळजी.
३.प्रत्येक कृतीबद्दल तपशीलवार सूचना.
४.प्रत्यक कृती करणे.
५.जरूर तिथे मार्गदर्शन व सूचना.
६.प्रत्येक टप्प्यानंतर पाहणी.
७.वैयक्तिक मार्गदर्शन.
८.दिग्दर्शनमुळे पाठ्यमुद्याचे स्पष्टीकरण.


४.प्रचलित अध्यापन पध्दतीतील दोष व सूक्ष्म अध्यापनाची आवश्यकता:
१.एकाच वेळी मोठ्या वर्गावर पाठ घेता येत नाही.
२.वर्ग नियंत्रण व शैक्षणिक साहित्य वापरण्याचे कौशल्य येत नाही.
३.वर्गपाठात अनेक कौशल्य एका कौशल्यातून अनेक कौशल्य बाहेर पडतात व हे कौशल्य बाहेर पाडण्यासाठी कौशल्य शिक्षकांजवळ पाहिजे .
४.सूक्ष्म अध्यापनात एकच कौशल्य शिकतात म्हणून सूक्ष्म अध्यापन ही एक नियंत्रित सराव पध्दती आहे म्हणून सूक्ष्म अध्यापनांची आवश्यकता आहे.

५.सूक्ष्म अध्यापनाचा इतिहास व व्याख्या :
सूक्ष्म अध्यापन हा शब्द अमेरिकेत १९६३ साली स्टनफोर्ड विद्यापीठात करण्यात आला. सूक्ष्म अध्यापनाचे पाठ किम रोमानी व डवाईट अलम यांनी घेतले.
सूक्ष्म अध्यापन : विशिष्ट अध्यापन वर्तनावर लक्ष केंद्रीत करून नियंत्रित वातावरणात केलेला नियंत्रित अध्यापन सराव.

६.सूक्ष्म अध्यापनाची वैशिष्टे व मर्यादा:
सूक्ष्म अध्यापनाची वैशिष्टे :
१.अध्यापनाच्या सर्व कौशल्याची माहिती होते.
२.अध्यापनातील गुंतागुती कमी होते व योग्य रीतीने सराव होतो.
३.अध्यापन परिणामकारक होते व चिकित्सक दृष्टीकोन विकसित होतो.
४.सूक्ष्म अध्यापनात प्रत्याभरण पध्दती आहे म्हणून स्वयं मूल्यमापन करता येते.

सूक्ष्म अध्यापनाच्या मर्यादा:
१.अध्यापन ही सलग कृती आहे त्यात कौशल्य अलग करणे ही कृत्रिमता आहे.
२.प्रत्येक कौशल्याचा वापर केव्हा व कोठे करायचा यांचे प्रमाणके ठरले नाहीत.
३.पाठ्यावस्तू व विद्यार्थी या दोन्ही घटकांकडे दुर्लक्ष होते.
४.सूक्ष्म पाठ टाचण काढतांना मर्यादीत विषय घटकावर घ्यावे लागते.त्यामुळे सर्व घटकाचे आकलन होत नाही.

७.सेतुपाठ हा सूक्ष्मपाठ व वर्गपाठ यातील दुवा आहे.
१.सूक्ष्मपाठ : कौशल्य-१ ,वेळ-५ ते ७ मिनिटे. विद्यार्थी संख्या-५ ते ७ .
२. .सेतुपाठ : कौशल्य-३ ,वेळ-१५ ते २० मिनिटे. विद्यार्थी संख्या-१५ ते २० .
३. .वर्गपाठ : कौशल्य-अनेक ,वेळ-३५ ते ४० मिनिटे. विद्यार्थी संख्या-३५ ते४० .

८.क्रमान्वित अध्ययनाचा इतिहास व व्याख्या :
क्रमान्वित अध्ययन हा शब्द अमेरिकेत १९५० साली हॉवर्ड विद्यापीठात डॉ .स्कीनर्स ने मांडला.
क्रमान्वित अध्ययन: लघुत्तम घटकाची तर्कसंगत मांडणी करून स्वताचे अध्ययन स्वता करण्याच्या क्रियेला क्रमान्वित अध्ययन म्हणतात.विद्यार्थांना सतत कामात गुंतवून ठेवण्यासाठी क्रमान्वित अध्ययन होय.

९.क्रमान्वित अध्ययनाची तत्वे:
१.क्रमवार रचना : पठ्याशांचे अर्थपूर्ण घटक पडणे .
२.लहान ज्ञानकण : उपघटकावर सुध्दा प्रश्न काढणे.
३.पायरी पायरीचे शिक्षण: प्रश्नांची ज्ञानात्मक पातळी.
४.कृतियुक्त प्रतिसाद : प्रश्नाचे उत्तर पाहण्याची सोय.
५.स्वताच्या गतीने अध्ययन : स्वताच्या गतीने अध्ययन करतात.
६.अंतिम चाचणी : विद्यार्थांची अंतिम चाचणी घेणे.
७.त्वरित निर्णय : विद्यार्थी चूक किंवा बरोबर अध्ययन करतात यांची चौकट तयार करणे.
८.योग्य चेतकाची व्यवस्था: चौकटीत नोंदवणे .

१०क्रमान्वित अध्ययन कार्यक्रम तयार करतांना घ्यावयाची दक्षता:
१.घटक वर्णनात्मक किंवा माहिती वजा नसावा.
२.घटकांचे पृथक्करण करणे .
३.क्रमान्वित अध्ययनाची ज्ञान चौकट तयार करणे.
१.बाबाच्या पाकिटात पैसे .........आहे. उत्तर –गुन्हा पाहता येते.

११.क्रमान्वित अध्यायाची वैशिष्टे व मर्यादा:
.क्रमान्वित अध्यायाची वैशिष्टे
१.विद्यार्थी स्वताच्या गतीने शिकतात.
२.विद्यार्थांना शिकवलेले पक्के स्मरणात राहते.
३.विद्यार्थांकडे वैयक्तिक लक्ष देता येते.
४.विद्यार्थांची दृष्टी कार्यप्रवण बनते.
क्रमान्वित अध्यायाची मर्यादा:
१.सर्वच घटकासाठी ही पध्दती उपयुक्त नाही.
२.विद्यार्थांना विषयाचे व्यापक स्वरूप लक्षात येत नाही.
३.विद्यार्थांचा भावनिक विकास होत नाही.
४.विद्यार्थांसाठी क्रमान्वित अध्ययन कार्यक्रम तयार करतांना वेळ व खर्च खूप लागतो.

१२.अध्यापनाचे प्रतिमाने : ( जनक डॉ.ब्रूस जॉयसी व मार्शवील )
अध्यापनाची प्रतिमाने म्हणजे एक प्रकारचे नियोजन असते त्याद्वारे अभ्यासक्रमाची रचना करतात.
अध्यापनाच्या प्रतिमानाचे प्रकार : कुटुंब/कुळात
१.ज्ञान प्रक्रिया प्रतिमाने : समस्या सोडवण्यासाठी .
२.व्यक्तिगत विकास प्रतिमाने : स्व'ची जाणीव निर्मिती साठी .
३.सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने : लीकाशाही टिकण्यासाठी.
४.वर्तन परिवर्तन प्रतिमाने : वर्तनात दृश्य स्वरुपात बदल करण्यासाठी.

१३.प्रतिमानाचा अभ्यास करण्याच्या पध्दती:
१.प्रतिमानाचे पदबंध : कृतीची रचना करणे.
२.अध्यापन प्रक्रियेची तत्वे : शिक्षक ,विद्यार्थी प्रतिसाद प्रतिमाने.
३.सामाजिक प्रणाली: शिक्षक,विद्यार्थी निश्चित भूमिका.
४.सह्यायभूत प्रणाली: संदर्भ ग्रंथ ,सहली.
५.प्रतिमानाचे प्रत्येक्ष व पोषित उद्दिष्टे: प्रत्येक प्रतिमाने हे उद्दिष्टावर आधारित आहेत.

१४.अध्यापनाच्या प्रतिमानाचे महत्व:
१.मानसशास्त्रीय तात्विक बैठक आहे.
२.विद्यार्थांना एकाच एक साच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे.
३.विद्यार्थांना वेगवेगळ्या परिसरात वागण्याची संधी.
४.विद्यार्थांचा व्यक्तिगत व सामुहिक विकास साधने.
५.विद्यार्थी उदगामी विचार करतो.
६.विद्यार्थी व शिक्षक यांच्यात जवळचा संबंध येतो.

४.अध्ययन व अध्यापनावर परिणाम करणारे घटक

१.शारीरिक स्वास्थाचा अध्ययन-अध्यापनावर होणारा परिणाम व शिक्षक –विद्यार्थांचे स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी आवश्यक घटक:
१.शरीर व मन यांचा अतुटचा संबंध आहे.
२.शारीरिक घटकावर मानसिक घटक निगडीत आहे.
३.शारीरिक स्वास्थ हे मन शांतीशी निगडीत आहे म्हणून त्या एका नाण्याचा दोन बाजू आहेत.
४.अध्ययानासाठी विद्यार्थांची शारीरिक व मानसिक तयारी असावी म्हणून त्यांनी :
१.नियमित व संतुलित आहार.
२.नियमित व्यायाम .
३.योग्य विश्रांती .
४.लसीकरण.
इत्यादी गोष्टीमुळे शिक्षकांचे विद्यार्थांचे शारीरिक स्वास्थ चांगले राहील.

२.अध्ययन –अध्यापनावर परिणाम करणारे सामाजिक घटक:
१.कुटूंब :
१.कुटूंब ही मुलांची पहिली शाळा त्यातून त्याला अनौपचारिक शिक्षण मिळते.
२.कुटूंब ही संस्था समाजाचा मुलभूत घटक आहे.
त्यामुळे –कुटूंबची आर्थिक आर्थिक स्थिती ,सामाजिक दर्जा,समाजाशी परस्पर संबंध योग्य असावे.
३. कुटूंबातील एक सुसंस्कृत आई शंभर शिक्षकांच्या तोडीची आहे.
४. कुटूंबाच्या अनौपचारिक शिक्षणाचा उपयोग करून विद्यार्थाला औपरिक शिक्षण देता येते म्हणून औपचारिक व अनौपचारिक शिक्षण ही जोडवात आहे.
२.शेजार : शेजाऱ्याचा अध्ययन-अध्यापनावर होणारा परिणाम.
१.शेजाऱ्याच्या परस्परांशी असणाऱ्या संबंधातून आत्मीयता निर्माण होते.
२.मुल शेजाऱ्याच्या सर्व गोष्टीचे अनुकरण करते.
३.म्हणून ग्रामीण व शहरी मुलामध्ये फरक दिसून येतो.
४.सुसंस्कारीत लोकाच्या परिसरात राहावे.

३.सामाजिक : सामाजिक घटकाचा अध्ययन-अध्यापनावर होणारा परिणाम.
१.जॉन राईट :-society is not group of people it is system of relation ship that exist between individuals of group.
२.सामाजिक घटक: आई ,कुटूंब ,शेजार ,शाळा इत्यादी घटक येतात .
३.शाळा हे समाज जीवनाचे केंद्र आहे.
४.समाज हा परिवर्तनाचा प्रेरक आहे.

५.मूल्यमापन

१.मूल्यमापन व मापन व मूल्यमापन यातील फरक :

२.मूल्यमापन प्रक्रियेचे सर्वसामान्य तत्वे :
१.निश्चित उद्दिष्टे: उद्दिष्टे लक्षात घेऊन मूल्यमापन तंत्र वापरणे.
२.साधनांच्या वापरासाठी विषयाची उद्दिष्टे निश्चित करणे.
३.साधनाचा उपयोग योग्य जागी करणे.
४.साधनाचा मर्यादा समजावून घेणे निष्कर्ष काढतांना चूका होऊ नये.
५.मूल्यमापन सतत चालणारी प्रक्रिया आहे.ते साध्य नव्हे एक साधन आहे.

३.क्षमताधिष्ठित मूल्यमापन व ते करतांना शिक्षकाने लक्षात घ्यावयाच्या गोष्टी यासाठी शिक्षकाने खालील शैक्षणिक बाबीवर भर द्यावे.
क्षमताधिष्ठीत मूल्यमापन : विद्यार्थांच्या क्षमता लक्षात घेऊन केलेले मूल्यमापन म्हणजे क्षमताधिष्ठीत मूल्यमापन .
१.अभ्यासक्रम :शिक्षणातून उत्पादन क्षमता हे राष्ट्रीय उद्दिष्टे आहे.
२.पाठ्यपुस्तक : पाठ्यपुस्तक = अभ्यासक्रम + उद्दिष्टे
३.अध्यापन पध्दती : शिक्षक व विद्यार्थांत आंतरक्रिया घडवून आणणे.
४.अध्ययन अनुभूती : विद्यार्थांचे वय,आवडी निवडी,अनुभव क्षमता.
५.मूल्यमापनाचे साधने: विद्यार्थांच्या प्रगतीचे मापन करण्यासाठी संख्यात्मक साधने तर विद्यार्थांचे आंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी गुणात्मक साधने.

४.अध्यापनाची उद्दिष्टे :
१.ज्ञान : विद्यार्थी स्मरण करतो,माहिती सांगतो,पाठकेलेले म्हणतो,वर्णन करतो.
२.आकलन : तुलना करतो,फरक सांगतो,जोड्या जुळवतो,साम्यभेद मांडतो.
३.उपयोजन : गणितातील प्रमेय सोडवतो,उदाहरणे सोडवतो,पाठ्यपुस्तक वाचून स्वत:भाषेत लेखन करतो.
४.कौशल्य : नकाशा काढतो,नकाशा भरतो,आकृती काढतो,रचना करतो.
५.अभिरुची : आवडीने कृती करतो ,रमून जातो.संग्रह करतो.कविता व गोष्टी म्हणतो .
६.अभिवृत्ती : एखाद्या गोष्टीकडे विद्यार्थांचा ज्ञानात्मक ,भावात्मक ,क्रियात्मक दृष्टीकोन आहे.

५.उद्दिष्टे ठरवितांना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी :
१.शिक्षणाचा मुलभूत पाया म्हणजे शिक्षणाचे मुलभूत केलेले उद्दिष्टे होत .
२.बालकातील वर्तन बदल व उद्दिष्टाची परिपूर्ती होणे आवश्यक आहे हेच शिक्षणाचे सध्या होय.
३.वर्तन बदल घडून येणे हे शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
४.दूरगामी उद्दिष्टाना शिक्षणाची ध्येय म्हणतात.
५.उद्दिष्टाच्या परिपूर्तीसाठी पोषक अशा विषयाची व उपक्रमांची निवड करणे व मांडणी करणे याला आकृतीबंध म्हणतात.

६.उद्दिष्टाचे स्पष्टीकरण लिहितांना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी :
१.स्पष्टीकरणात आशय व वर्तन बदल घेणे आवश्यक आहे.
उदा- विद्यार्थी दोन अंकी बेरीज करतो. यात विद्यार्थी दोन अंकी हा आशय आहे व बेरीज करतो हा वर्तन बदल.
२.एका वर्तन बदलासाठी एकाच विधान असावे.
३.हे विधान वर्तमान काळात ,तृतीय पुरुषी एकवचनात असावे.
४.वर्तन बदल कोणत्या परिस्थितीत पहावयास मिळेल याचा उल्लेख स्पष्टीकरणात असावा.
उदा-महाराष्ट्राचा नकाशा दिला असता त्यातील धरणाच्या जागा दाखवितो.

७.अध्ययन अनुभव व अध्ययन प्रसंग यातील फरक :
१.चेताकांशी होणाऱ्या प्रतिसादाला अध्ययन अनुभव म्हणतात. व अध्ययन अनुभव देण्यासाठी निर्माण केलेल्या वातावरणाला अध्ययन प्रसंग म्हणतात.
२.अध्ययन अनुभवाने मेंदूवर काही संस्कार होतात. व अध्ययन प्रसंग हा मूर्त स्वरूपाचा असतो.
३.अध्ययन अनुभव म्हणजे अध्ययन प्रसंगातून साध्य होणारी गोष्ट आहे. व अध्ययन प्रसंग हे अध्ययन अनुभव देणारे साधन आहे.
४.अध्ययन अनुभवाचे प्रकार प्रत्यक्ष अनुभव व अप्रत्यक्ष अनुभव होय व अध्ययन प्रसंगाचे प्रकार अस्सल प्रसंग व अप्रत्यक्ष प्रसंग .

८.अध्ययन अनुभवाचे प्रकार :
१.प्रत्यक्ष अनुभव : विद्यार्थांना आकाशात प्रत्यक्ष तारा दाखवणे त्यास प्रत्यक्ष अनुभव म्हणतात.
२.अप्रत्यक्ष अनुभव : विद्यार्थांना तारा आकाशात तारा न दाखवता त्याचे चित्र वर्गात दाखवणे त्यास अप्रत्यक्ष अनुभव म्हणतात.

९.अध्ययन अनुभवाची निवड करतांना शिक्षकांने लक्षात घ्यावयाच्या गोष्टी :
१.अध्ययन अनुभव ही विद्यार्थांच्या ज्ञानात्मक ,भावात्मक,क्रियात्मक ह्या तिन्ही स्तरावरील असावी.
२.अध्ययन अनुभव ही विद्यार्थांच्या परीचीयाची व परिसरातील असावी.
३.विद्यार्थांना एकच एक अध्ययन अनुभव देऊ नये त्यात विविधता असावी.
४.अनुभवाद्वारे बालकांच्या वर्तनात बदल घडवून येतो म्हणून विद्यार्थांना जे अनुभव देण्याचे आहे ते अधिक अधिक प्रत्यक्ष स्वरुपात कसे देता येतील यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील असावे.
१०.अध्ययन अनुभवाचे केंद्र :
१.शाळा : स्पर्धा,सहशालेय उपक्रम.
२.घर: घरातील व्यक्तीचे वर्तन,संस्कार.
३.समाज : परिसर ,व्यक्ती-व्यक्तीतील आंतरक्रिया.
४.बहुमाध्यम : दूरचित्रवाणी ,आकाशवाणी.
५. मैदान : शारीरिक कौशल्य,खेळाडू.
६.मित्र: गटाचे नेतृत्व,सहकार्य.
७.सहली: निरीक्षण,निसर्गप्रेम, निसर्गसौदर्य.

११.अध्यापनाचे उद्दिष्टे ,अध्ययन अनुभव व मूल्यमापनाची साधने यांचा त्रिकोण काढणे शिक्षण प्रक्रिया त्रिकोण :
१.अध्यापनाची उद्दिष्टे : त्रिकोणाचा शिरोबिंदू
२.अध्ययन अनुभव : उद्दिष्टे सध्या करण्याचे साधन .
३.मूल्यमापनाचे साधने : उद्दिष्टे कितीपत साध्य झाली यांची पाहणी करणे.

१२.अध्ययन निष्पती व अध्ययन निष्पती ही तर विद्यार्थांच्या वर्तन बदलाचे चित्र आहे व विद्यार्थात घडून येणारे बदल:
अध्ययन निष्पती : प्रत्येक स्पष्टीकरण विद्यार्थांच्या वर्तनात व उद्दिष्टाच्या संदर्भात झालेल्या सूक्ष्म बदलाचे वर्णन करते त्यास अध्ययनाचे फलित म्हणतात त्यास अध्ययन निष्पती म्हणतात.
अध्ययन निष्पती म्हणजे विद्यार्थांच्या अंतिम बदलाचे स्पष्ट चित्र होय.
विद्यार्थांच्या अंतिम वर्तन बदलाचे स्पष्ट चित्र :
१.प्रारंभिक वर्तन : नेहाला पोहता येत नाही.
२.शैक्षणिक अनुभव : नेहाला पोहणे शिकवले .
३.अंतिम वर्तनबदल : नेहा चांगली पोहते.

विद्यार्थात घडून येणारे बदल :
१.ज्ञानात्मक किंवा बोधात्मक बदल : नवीन ज्ञान प्राप्ती करणे.
२.भावात्मक बदल: भावना द्वारे होणारे बदल.
३.क्रियात्मक बदल : कृती द्वारे होणारे बदल.

६.अध्ययन –अध्यापनाचे नियोजन

१.नियोजन :
१.नि:-निश्चित उद्दिष्टे .
२.यो:-योजना पूर्वक प्रयत्न .
३.ज :- जरूर तिथे सर्व साधनाचा वापर .
४.न :- नवीन उपक्रमाचा समावेश. नियोजन करतांना विद्यार्थी केंदबिंदू मानला जातो.

२.अभ्यासक्रमात नियोजनाचे तत्वे:
१.उद्दिष्टाचा विचार.
२.विषय व उपक्रमाची विभागणी .
३.वार्षिक नियोजन .
४.सहशालेय कार्यक्रम .
५.वेळेचे नियोजन .
६.परिसर .
७.निसर्गाचा विचार .
८.क्षमताधिष्टीत धोरण.
९.शाळेचा दर्जा .
१०.सुट्टया.

३.नियोजाची आवश्यकता व उपयोग :
१.नियोजन करतांना प्रथम उद्दिष्टाचा विचार करावा.
२.नियोजन करतांना विविध उपक्रमाची विभागणी व विषयाची विभागणी व्यवस्थित होते.
३.नियोजनात अध्ययन-अध्यापन व्यवस्थित होण्यासाठी वार्षिक नियोजन करता.
४.नियोजांमुळे विद्यार्थाला खेळ ,स्पर्धा,सहली इत्यादी सहशालेय कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळते.
५.नियोजनामुळे शिक्षकांचा शारीरिक व मानसिक तान कमी होतो कारण व्यवस्थित वेळेचे नियोजन होते.
६.नियोजनामुळे परिसरातील अनेक गोष्टीचा विद्यार्थांना उपभोग घेता येतो.
७.नियोजनामुळे विद्यार्थांना निसर्गात अनेक अध्ययन प्रसंग व अध्ययन अनुभव देता येतात.
८.नियोजन हा अध्ययन –अध्यापनाचा कणा आहे.
९.नियोजनामुळे मूल्यमापनाची दिशा स्पष्ट होते.
१०.नियोजनामुळे शिक्षकांना शासनामार्फत मिळणाऱ्या सुट्या व अचानक लागणाऱ्या सुट्या वगळून वार्षिक नियोजन करता येते. व वार्षिक नियोजनाच्या तासिक ,लक्षात घेताल्याकी घटक व उपघटकाचा विचार करून घटक नियोजन करता येते व घटक नियोजन केल्यावर प्रत्येक घटक केव्हा शिकवायचा यासाठी पाठ नियोजन करता येते.

४.नियोजनाच्या पायऱ्या किंवा प्रकार :
१.वार्षिक नियोजन .
२.घटक नियोजन.
३.पाठ नियोजन.

५.वार्षिक नियोजन व त्याचे महत्व :
१.तासिक,घटक-उपघटकाचा विचार ,उद्दिष्टे ,अभ्यासपूरक कार्यक्रम ,परीक्षेचे नियोजन याचा विचार करून केलेल्या वर्षभराच्या कामाच्या नियोजनाला वार्षिक नियोजन म्हणतात.
२.वार्षिक नियोजन संपूर्ण वर्षासाठी असते.
३.वार्षिक नियोजनात संपूर्ण अभ्यासक्रमाचा अभ्यास असतो.
४.वार्षिक नियोजनात संपूर्ण घटकाचे एकत्रीकरण असते.
५.वार्षिक नियोजन हे शालांत परीक्षेसाठी असते.

६.वार्षिक नियोजन करतांना लक्षात घ्यावयाचे मुद्दे व वार्षिक नियोजनाच्या पायऱ्या :
१.तासिका : सुट्टयाचा विचार करून काढणे .
२.घटक-उपघटक यांचा विचार :मोठा व लहान घटक लक्षात घेऊन तासिक देणे.
३.उद्दिष्टे : ज्ञान,आकलन ,उपयोजन ,कौशल्य,अभिरुची ,अभिवृत्ती ह्या उद्दीष्टाची साध्यता लक्षात घेणे.
४.अभ्यास पूरक कार्यक्रम : घटकावर आधारित खेळ ,स्पर्धा,सहल,व ऋतू मनानुसार घटक शिकवणे .
५.परीक्षेचा विचार: घटक चाचणी ,तीमाई परीक्षा,सहामाई परीक्षा,वार्षिक परीक्षाचा,विचार,तासिका सोडून देणे.या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन वार्षिक नियोजन करतात.

७.वार्षिक नियोजनाची सहप्रमानता:
१.वार्षिक नियोजन शाळेतील एका शिक्षकांने न करता सर्व शिक्षकांने मिळून केल्यास त्यात अधिक वस्तुनिष्ठता आणता येते.
२.एखादा शिक्षक शाळा सोडून गेल्यास दुसऱ्या शिक्षकाला त्याचा अभ्यास पूर्ण करून घेता येतो.
३.वर्षभराच्या कामाचे नियोजन होते.
४.अभ्यासक्रमाची दिशा नक्की होऊन विद्यार्थांवर चांगले संस्कार करता येतात.

८.वार्षिक नियोजनात सहशालेय कार्यक्रमाचे महत्व :
१.बौद्धिक उपक्रम: वकृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा.
२.सांस्कृतिक उपक्रम: सण,जयंत्या,पुण्यतिथ्या .
३. कलात्मक उपक्रम: नृत्य,नाट्य,संगीत.
४.सामाजिक उपक्रम: ग्राम सफाई,शाळा सफाई.
५.इतर उपक्रम: छंद गृह,क्रिडास्पर्धा,मुक्तांग.

९.वार्षिक नियोजन तक्ता:
१.महिने. व महिन्याचे आठवडे.
२.घटक,
३.उपघटक.
४.उद्दिष्टे: ज्ञान,आकलन,उपयोजन,कौशल्य,अभिरुची,अभिवृत्ती.
५.मूल्यमापन.
६.तासिका .१०.घटक नियोजन व त्याचे महत्व :
१.एखाद्या पाठ्यांशाची घटकामध्ये विभागणी करतांना त्यातील एकत्रीनसी व सलग भागाची जुळणी करणे म्हणजे घटक नियोजन होय.
२.घटक नियोजन फक्त एका घटकासाठी असते.
३.घटक नियोजनात पाठ्यक्रमात असलेल्या पाठातील वाड्मयानुसार किंवा आशयानुसार घटक पडतात.
४.घटक नियोजनात प्रत्येक घटकासाठी वेगळा पाठ असतो.
५.घटक नियोजन हे घटक चाचणी साठी सुद्धा करता.

११.घटक नियोजनांचे अंगे /किंवा घटक नियोजन करतांना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी :
१.काय शिकायचे : पाठाची काठीण्यपातळी,पाठ्यांशाचे व्याप्ती व उद्दिष्टे,पाठ्यांशाचे पृथक्करण.
२.कसे शिकायचे : अध्यापन पध्दती ,अध्ययन प्रसंग व अध्ययन अनुभूती व शैक्षणिक साधने.
३.का शिकायचे : विद्यार्थांचा ज्ञानात्मक ,भावात्मक ,क्रियात्मक असा सर्वकष विकास साधण्यासाठी.
४.किती उद्दिष्टे प्राप्ती झाली: हे पाहण्यासाठी घटक चाचणी द्वारे मूल्यमापन करतात.

१२.घटक नियोजनाचे फायदे :
१.पाठ्यांशाची काठीण्य पातळी ,व्याप्ती व उद्दिष्टे व पाठ्यांशाची पृथक्करण करता येते.
२.अध्यापन पद्धती अध्ययन प्रसंग व अनुभव व शैक्षणिक साधनाचा योग्य जागी वापर करता येतो.
३.विद्यार्थांचा ज्ञानात्मक ,भावात्मक ,क्रियात्मक असा सर्वकष विकास घडून यावे म्हणून प्रयत्न राहता येते.
४.उद्दिष्टे प्राप्ती पाहण्यासाठी घटक चाचणी घेऊन मूल्यमापन करता येते.

१३.घटक नियोजनाचा तक्ता:
१.उपघटक व पाठ्यमुद्दे .
२.उद्दिष्टे व स्पष्टीकरण.: ज्ञान ,आकलन,उपयोजन,कौशल्य,अभिरुची,अभिवृत्ती.
३.अध्ययन अनुभव : शिक्षक कृती व विद्यार्थी कृती .
४.शैक्षणिक साधने .
५.मूल्यमापन : घटक चाचणी .१४.पाठ नियोजन व त्याचे महत्व :
१.प्रत्यक्ष अध्यापनास सुरुवात करण्यापूर्वी पूर्व तयारी म्हणजे पाठ नियोजन होय.
२.एका तासिकेत जेवढा पाठ्यांश शिकवता येईल तेवढा भाग म्हणजे पाठ होय.
३.पाठ नियोजनात सलग संस्कार कमी होण्यासाठी शक्यता असते.
४.पाठ नियोजन ३५ ते ४० मिनिटात घेण्यासाठी करावे लागते.
५.पाठ नियोजनात घटकाचे विश्लेषण विस्तार पूर्वक करावे लागते.

१५.पाठ नियोजनाचे फायदे:
१.अध्यापन नियोजित वेळात पूर्ण होते.
२.विद्यार्थांच्या उद्दिष्टाची कल्पना येते.
३.शैक्षणिक साधनाचा योग्य जागी वापर करता येतो.
४.विद्यार्थांच्या सर्जनशीलतेला वाव मिळतो.
५.विद्यार्थांना चांगले संस्कार करता येतात.

१६.पाठ नियोजन तक्ता:
१.वर्ग व तुकडी .
२.विषय
३.घटक
४.उपघटक.
५.तासिका
६.पूर्व ज्ञान .
७.उद्दिष्टे व स्पष्टीकरण व अध्ययन अनुभव .
८.अध्यापन पध्दती
९.संदर्भ ग्रंथ वापर .
१०.शैक्षणिक साधन .
११.पाठ हर्बर्टपंचपद्धी पायऱ्या : प्रस्तावना ,हेतुकथन ,विषय विवेचन,संकलन ,स्वाध्याय.
१२.फलक लेखन .

७.मूल्यमापन साधने

१.मूल्यमापनाचे संख्यात्मक साधने प्रक्रार:
१.लेखी परीक्षा (प्रचलित परीक्षा पध्दती)
२.तोंडी परीक्षा.
३.प्रात्यक्षिक परीक्षा.

१.लेखी परीक्षा वैशिष्टे व मर्यादा:
लेखी परीक्षा वैशिष्टे :
१.परीक्षा मध्ये विश्वाससनियता व सहप्रमाणता जास्त असते.
२.उद्दिष्टे ,अध्ययन अनुभव व आशय या तिन्ही घटकाचा विचार करून परीक्षेचे नियोजन करता येते.
३.उत्तर पत्रिकांच्या रूपाने विद्यार्थानकडून मिळालेला पुरावा बराच काळ जपून ठेवता येतो .
४.अनेक विद्यार्थी ठराविक वेळात चाचणी पूर्ण करतात व उत्तर तपासतांना उत्तर सूची मिळते म्हणून यात वस्तुनिष्ठता वाढते.
लेखी परीक्षा मर्यादा :
१.लेखी परीक्षा फक्त माहितीचे मापन होते.
२.लेखी परीक्षेत परीक्षकाला प्रश्नाचा चटकन प्रतिसाद मिळत नाही व विद्यार्थांना सतत तीन तास लेखन करावे लागते ते कंटाळतात.
३.लेखन कौशल्यचाच विकास होतो.
४.हाताने अपंग असणाऱ्या मुलासाठी ही परीक्षा उपयुक्त नाही.
लेखी परीक्षा सुधारणा :
१.प्रश्न पत्रिकेत तीन प्रकारचे प्रश्न असावे.वस्तुनिष्ठ,लघुत्तरी,दिर्घोत्तरी प्रश्न.
२.सोपे व कठीण प्रश्न समान असावे.
३.आजकाल पेपर तपासण्यात सुद्धा सुधारणा होत आहेत.

२.तोंडी परीक्षा:
तोंडी परीक्षा वैशिष्टे :
१.तोंडी परीक्षेत विद्यार्थांचे रसग्रहण शक्ती ,तर्कशक्ती ,निर्णयशक्ती याचे मापन करता येते.
२.तोंडी परीक्षेत परीक्षकाला प्रश्नाचे उत्तरे चटकन मिळतात.
३.विद्यार्थांचे लेखन कौशल्य सोडून श्रवण,भाषण ,वाचन कौशल्याचा विकास पाहता येतो.
४.हाताने अपंग असणाऱ्या विद्यार्थांसाठी ही परीक्षा उपयुक्त आहे.

तोंडी परीक्षा मर्यादा :
१.सगळ्यांना सारखे प्रश्न विचारले जात नाहीत त्यामुळे यात विश्वससनियता व सप्रमाता कमी असते.
२.परीक्षेचे पूर्वनियोजन नसेल तर परीक्षा आत्मनिष्ठ बनते.
३.विद्यार्थांने दिलेल्या प्रश्नाचा पुरावा शिक्षकांजवळ नसतो.
४.एका वेळा एकच विद्यार्थांची परीक्षा घेता येते त्यामुळे खूप वेळा लागतो.

तोंडी परीक्षा सुधारणा :
१.सर्व प्रश्नाची उत्तरे आधीच तयार करून ठेवावे.
२.सोपे व कठीण प्रश्न समान असावे.
३.जो वर्तन बदल लेखी परीक्षेतून होत नाही तो तोंडी परीक्षेद्वारे करून घ्यावे.

३.प्रात्यक्षिक परीक्षा :
प्रात्यक्षिक परीक्षा वैशिष्टे :
१.विद्यार्थांना कृती करावी लागते म्हणून त्याचा क्रियात्मक विकास होतो.
२.प्रश्नाचे उत्तर कृतीतून द्यावे लागते उदा-गायन,वादन,नृत्य,चित्रकला.
३.ज्याला आपल्या भावना भाषेद्वारे व्यक्त करता येत नाही त्यासाठी ही परीक्षा कृती द्वारे घेतात.
४.मुक्या व बहिऱ्या विद्यार्थांसाठी ही परीक्षा अधिक उपयुक्त आहे.
प्रात्यक्षिक परीक्षा मर्यादा :
१.विद्यार्थांचा ज्ञानात्मक,भावात्मक,उद्दिष्टाचे मापन होत नाही.
२.विद्यार्थी कृतीचा क्रम लावून विद्यार्थी कौशल्याच्या ठेवून विद्यार्थांच्या कृतीचे निरीक्षण करावे लागते व अपूर्ण निरीक्षणामुळे चुकीचे मूल्यमापन होण्याची शक्यता असते.
३.ही परीक्षा कृतीद्वारे घेतली जाते म्हणून साहित्य व साधनाची जमवाजमव करावी लागते यासाठी वेळ ,खर्च खूप लागतात.
४.या परीक्षेत व्यक्तिनिष्ठता खूप येण्याची शक्यता अधिक आहे.

प्रात्यक्षिक परीक्षा सुधारणा :
१.विद्यार्थांच्या कृतीचा क्रम लावून कौशल्याच्या नोंदी ठेवून वस्तुनिष्ठ निरीक्षण करावे.
२.अनेक साधनाची जमवाजमव परीक्षेच्या आधीच करून घ्यावी .
३.आदर्श कृतीचे वैशिष्टे आधीच ठरवून घ्यावे .

२.परीक्षेच्या नियोजनाची आवश्यकता:
१.आशयाचे सखोल ज्ञान.
२.उद्दिष्टाच्या स्पष्टीकरणाचे ज्ञान मिळते.
३.बौद्धिक स्तर.
४.प्रश्न पत्रिका तयार करणे.
५.महात्वांश .

३.संविधान तक्ता व त्याची आवश्यकता:
संविधान तक्ता: प्रश्न पत्रिकेच्या त्रिमिती आराखडा ,उद्दिष्टानुसार महत्वांश,आशयानुसार महत्वांश,प्रश्न प्रकारानुसार महत्वांश ह्या प्रश्न पत्रिकेच्या त्रिमिती आराखड्यास संविधान तक्ता म्हणतात.
संविधान तक्ता आवश्यकता:
१.संविधान तक्ता केल्यामुळे मूल्यमापन उद्दिष्टां नुसार होते.
२.आशयातील सर्व घटकांना योग्य महत्व दिले जाते.
३.संविधान तक्तामुळे प्रश्नाची विविधता येते.
४.पाठ्यांशाच्या सर्व भागाचे अध्ययन करण्यावर विद्यार्थी भर देतात.

संविधान तक्ता आवश्यकता:
१.उपघटक : मुद्दे व उप मुद्दे.
२.ज्ञान:निबंधवजा प्रश्न,लघुत्तरी प्रश्न,वस्तुनिष्ठ प्रश्न.
३.आकलन: निबंधवजा प्रश्न,लघुत्तरी प्रश्न,वस्तुनिष्ठ प्रश्न.
४.उपयोजन : निबंधवजा प्रश्न,लघुत्तरी प्रश्न,वस्तुनिष्ठ प्रश्न.
४.कौशल्य: निबंधवजा प्रश्न,लघुत्तरी प्रश्न,वस्तुनिष्ठ प्रश्न.

४.प्रश्नांचे प्रकार :
१.निबंध वजा किंवा दीर्घोत्तरी प्रश्न :
२.लघुत्तरी प्रश्न
३.वस्तुनिष्ठ प्रश्न :
१.प्रत्यावाहानात्मक प्रश्न (आठवणे):-रिकाम्या जागा भरा व एका वाक्यात उत्तरे द्या.
२.प्रत्याभिज्ञानात्मक प्रश्न (ओळखणे)
१.व्दिपर्यायी प्रश्न.
२.बहु पर्यायीपश्न.
३.जोड्या लावा.
४.सूचीनुसार जोड्या लावा.
५.अर्थाविष्कार करणारे प्रश्न : विद्यार्थांची आकलन क्षमता अजमाण्यासाठी अर्थविष्कार करणारे प्रश्न.

५.प्रत्यावाहानात्मक प्रश्न व प्रत्याभिज्ञानात्मक प्रश्न फरक:
१.प्रत्यावाहानात्मक प्रश्न म्हणजे आठवणे व प्रत्याभिज्ञानात्मक प्रश्न ओळखणे.
२. प्रत्यावाहानात्मक प्रश्नाची रचना करणे सोपे आहे व प्रत्याभिज्ञानात्मक प्रश्नांची रचना करणे अवघड आहे.
३. प्रत्यावाहानात्मक प्रश्नातून विद्यार्थानाच्या ज्ञान या उद्दिष्टाचे मूल्यमापन करता येते व प्रत्याभिज्ञानात्मक प्रश्नामुळे विद्यार्थांच्या विचारला फार कमी चालना मिळते.
४. १.प्रत्यावाहानात्मक प्रश्नात रिकाम्या जागा भरा व एका वाक्यात उत्तरे द्या असे प्रश्न विचारतात व२.प्रत्याभिज्ञानात्मक प्रश्नात व्दिपर्यायी प्रश्न,बहु पर्यायीपश्न ,जोड्या लावा ,सूचीनुसार जोड्या लावा ,अर्थाविष्कार करणारे प्रश्न : विद्यार्थांची आकलन क्षमता अजमाण्यासाठी अर्थविष्कार करणारे प्रश्न असे प्रश्न विचारता येतात.६.निबंधवजा प्रश्न व वस्तुनिष्ठ प्रश्न यातील फरक :
१. निबंधवजा प्रश्नात आपले विचार व्यक्त करण्याचा वाव असतो व वस्तुनिष्ठ प्रश्नात आपले विचार व्यक्त करण्याला वाव नसतो.
२. निबंधवजा प्रश्नात पुस्तकाच्या मोठ्या भागावर प्रश्न काढत येतात व वस्तुनिष्ठ प्रश्नात पुस्तकाच्या मोठ्या भागावर प्रश्न काढता येत नाहीत.
३. निबंधवजा प्रश्नाची रचना करणे सोपे असते व वस्तुनिष्ठ प्रश्नात प्रश्नाची रचना करणे फार अवघड असते.
४. निबंधवजा प्रश्नाची प्रश्न पत्रिका छपाईच्या दृष्टीने सोपी व कमी खर्चाची असते व वस्तुनिष्ठ प्रश्न पत्रिका छपाईच्या दृष्टीने अधिक अवघड व अधिक खर्चाची आहे.
५.निबंध वजा प्रश्नाची सुधारित आवृत्ती म्हणून लघुत्तरी प्रश्न होय व वस्तुनिष्ठ प्रश्नाचे दोन प्रकार असतात एक प्रत्यावाहानात्मक प्रश्न व दुसरा प्रत्याभिज्ञानात्मक प्रश्न .

७.मूल्यमापनाचे गुणात्मक साधने :
१.निरीक्षण तंत्र :
१.पडताळा सूची .
२.पद्निश्चयन श्रेणी: वर्णनात्मक,अकांत्मक,आलेखात्मक.
३.प्रासंगिक नोंदी.
४.प्रगती पुस्तक.
५.संकलित नोंद पत्रक.

२.आत्मनिरीक्षणात्मक तंत्र :
१.समस्या सूची.
२.अभिरुची प्रश्नावली.
३.मुलाखती.

३.प्रक्षेपण तंत्र :
१.वाक्यपूर्ती .
२.गोष्ट पूर्ण करणे.
३.बाहुल्या खेळ.
४.चित्र काढणे.
५.दैनंदिनी लेखन.

४.समाजामिती तंत्र :
१.समाजामिती आलेख .
२.ओळख पाहू.
१.निरीक्षणात्मक तंत्र :
१.पडताळा सूची :कौशल्य प्राप्ती साठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याची यादी करून त्यावरून विद्यार्थांनी कोणत्या गोष्टीत कौशल्य प्राप्त केले हे पाहणे म्हणजे पडताळा सूची होय.
१.कौशल्य प्राप्त झाले असेल तर बरोबर ची खुण करणे .
२.कौशल्य प्राप्त झाले नसेल तर गुणाकाराची खुण करणे .
पडताळा सूचीचा नमुना विद्यार्थी प्रगट वाचन पाहणे :
१.प्रगट वाचनातील घटक २.विद्यार्थांचे नाव .
१.सुस्पष्ट वाचन करतो.
२.आवाजात चढ-उतार करून वाचन करतो.
३.स्वरावर जोर देऊन वाचन करतो.
४.योग्य गतीत वाचन करतो.
५.कविता म्हणत असतांना लय ,कृती करतो.
६.योग्य हावभावासह वाचन करतो.
कौशल्य प्राप्तीसाठी आवश्यक असणाऱ्या बाबीची यादी तयार करणे म्हणजे पडताळा सूची होय.

२.पदनिश्चयन श्रेणी : शालेय व सहशालेय उपक्रमात घेतलेल्या विद्यार्थांच्या किती सहभागी झाले हे पाहण्यासाठी त्या उपक्रमात त्याचे पदनिश्चित करणे.
शाळेत विविध उपक्रम होतात त्यात विद्यार्थी सहभाग पाहण्यासाठी पदनिश्चयन
श्रेणी द्वारे विद्यार्थांचे मूल्यमापन करता येते.
१.अंकात्मक पदनिश्चयन श्रेणी : ०,२,५,८,१० अंक मांडून पद दाखवणे .
२.वर्णनात्मक पदनिश्चयन श्रेणी:विद्यार्थांच्या सहभागाच्या जागी बरोबरची खुण करणे.उपक्रमाचे नाव लिहिणे .
१.उपक्रमातील सहभाग . २.विद्यार्थांचे नाव .
१.विद्यार्थी कधी कधी सहभागी होतो.
२.क्वचित सहभागी होतो.
३.कधी कधी सहभागी होतो.
४.अनेक वेळा सहभागी होतो.
५.नेहमी सहभागी होतो.
३.आलेखात्मक पदनिश्चयन श्रेणी : कधीनाही ,क्वचित,कधी कधी,अनेकवेळा,नेहमी.

३.प्रासंगिक नोंदी : विशिष्ट प्रसंगाने घेतलेल्या नोंदीला प्रसंगीक नोंदी घेतल्या जातात त्याला प्रासंगिक नोंदी म्हणतात.
१.विद्यार्थांच्या वर्तनाच्या नोंदीला प्रसंगी नोंदी म्हणतात.
२.प्रासंगिक नोंदीत विद्यार्थांचे नाव ,दिनांक ,वर्ग ,स्थळ,लिहावे.
३.दैनंदिन व्यवहारातील नोंद घेवू नये.
४.नोंदी आटोपशीर व अर्थपूर्ण असाव्यात.

४.प्रगती पुस्तक :
१.प्रगती पत्रक म्हणजे विद्यार्थांच्या वर्तनाचा स्पष्ट व स्वच्छ् प्रतिबिंब दाखविणारा आरसा आहे.
२.प्रगती पत्रकात विद्यार्थांच्या वर्तनातील सर्व गुणात्मक मूल्यमापन व संख्यात्मक मूल्यमापन यांची पूर्ण माहिती श्रेणीच्या स्वरुपात तयार केली जाते.
३.प्रगती पत्रकामुळे पालकांना आपल्या पाल्याची प्रगती कळते.
४.विद्यार्थांना ही आपण पुढे काय करावे यांची माहिती मिळते.
५.शिक्षकांजवळ विद्यार्थांच्या सर्व गुणांचा पुरावा असतो .

५.संकलित नोंदपत्रक :
विद्यार्थांच्या प्रगती पुस्तकातून सर्व गुणाच्या नोंदी फक्त श्रेणीच्या स्वरुपात दाखवणे म्हणजे संकलित नोंद्पत्रक होय.हे विद्यार्थांना वर्षाच्या शेवटी देण्यात येते.२.आत्म निरीक्षणात्मक तंत्र:
१.समस्या सूची : विद्यार्थांचे अडथळे ,समस्या जाणून घेण्यासाठी व त्या सोडवण्यासाठी शिक्षकाने तयार केलेली सूची म्हणजे समस्या सूची.
अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी समस्या सूची तयार करणे:
समस्या असलेल्या चौकटीत बरोबरची खुण करावी:
१.अभ्यासातील अडचणी २.समस्यांची खुण.
१.लवकर जेवण मिळत नाही.
२.शाळा खूप दूर आहे.
३.घरात सतत गोंधळ असतो.
४.शेजारी मोठ्याने टेप लावतात.
५.मित्रा बरोबर खेळल्यामुळे वेळ मिळत नाही.
६.पुस्तक नाहीत.
७.वाचन करायची पद्धत समजली नाही.
८.घरी सतत काम सांगतात.
९.अभ्यासात मन लागत नाही.

२.अभिरुची प्रश्नावली : विद्यार्थांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी तयार केलेली सूची म्हणजे अभिरुची प्रश्नावली.विद्यार्थाबद्द्ल प्रतिसाद
१.होय. बरोबर खुण, २.नाही. गुणाकार खुण ३.सांगता येत नाही.शून्य खुण करणे .
विद्यार्थांना कोणत्या गोष्टी आवडतात यांची अभिरुची प्रश्नावली खालील प्रमाणे :
१.विद्यार्थांना आवडणाऱ्या गोष्टी २. होय. ३.नाही . ४. सांगता येत नाही.
१.गोष्ट सांगणे आवडते.
२.पाठांतर करणे आवडते.
३.भेंड्या ,अंताक्षरी आवडते,खेळ आवडतात..
४.चित्र काढणे आवडते.

३.मुलाखत व मुलाखतीचे प्रकार :
मुलाखत :एखाद्या व्यक्तीला समक्ष भेटून प्रश्नोत्तर द्वारे त्याच्या व्यवसाय संबंधी माहिती विचारणे म्हणजे मुलाखत होय.
१.प्रस्तावना :दिलखुलास पणे मुलाखत घेणे.
२.मध्य : त्यांच्या व्यवसायविषयी माहिती विचारणे .
३.शेवट :मुलाखत घेणाऱ्यात समजूतदार पणा आवश्यक आहे.
मुलाखतीचे प्रकार :
१.अनौपचारिक मुलाखत : शाळेत प्रात्यक्षिक साठी घेतलेली मुलाखत.
२.औपचारिक मुलाखत : नोकरीसाठी देण्यात येणारी मुलाखत.

४.प्रक्षेपण तंत्र:
विद्यार्थांच्या अंतरंगाचा शोध घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्राला प्रक्षेपण तंत्र म्हणतात.
१.वाक्यपुर्ती :शाळेतून घरी गेल्यावर मी ..............
२.गोष्ट पूर्ण करा: एक मुलगा आहे तो ...............
३.बाहुल्या खेळ : भातुकलीच्या खेळातून आई वडिलांच्या भावना मांडतात.
४.चित्र काढणे : रोशार्क चित्रात २० चित्रे असतात. त्यात शाईचा डागाणे चित्र कडून त्यातून विद्यार्थांना त्याच्या भावना कल्पना जाणून घेता येते.
५.दैनंदिनी : मुलांना रोज दैनंदिनी लिहिण्यास देणे.

५.समाजामिती तंत्र : १९४२ साली मोरेंनी नाव दिले . १९४७ साली त्यात बदल करून जेकीन्स ने नाम निदर्शन तंत्र नाव दिले
१.समाजमिती आलेख काढून विद्यार्थांच्या सामाजिक संबंध जाणून घेता येतात.
२.ओळखा पाहू या : शिक्षक विद्यार्थांना विधाने देतात.
विद्यार्थी उत्तरे लिहितात:
१.वर्गात सतत अभ्यास करणारा .......... ..आहे.
२.वर्गात सतत झोपणारा ........................आहे.
३.वर्गात दुपारी पळून जाणारा ....................आहे.
४.शाळेत सतत गैर हजर राहणारा ...................आहे.
५.वर्गात इतर मुलांना मारणारा ......................आहे.८.क्षमताधिष्टीत अध्यापनशिवाय मूल्यमापन करणे निर्थक आहे:
१.विद्यार्थात निर्माण होणाऱ्या क्षमताची जाणीव ठेवून केलेले अध्यापन म्हणजे क्षमाताधिष्टीत अध्यापन होय.
२.किमान अध्ययन क्षमता ह्या शैक्षणिक वर्ष पूर्ण होई पर्यंत पूर्ण व्हावे अशी अपेक्षा असते.
३.क्षमता प्राप्त करण्यासाठी क्षमता धिष्टीत चाचण्याचा,इतर मूल्यमापन तंत्राचा उपयोग करण्यात यावा.
४.क्षमाताधिष्टीत अध्यापन केल्यावरच क्षमाताधिष्टीत मूल्यमापन करता येऊ शकते म्हणूनच क्षमाताधिष्टीत अध्यापन शिवाय मूल्यमापन करणे निरर्थक आहे असे म्हणतात.

८.सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन

१.प्रचलित मूल्यमापन पध्दतीतील त्रुटी :
१.विद्यार्थांत परीक्षेत दिलेलेल्या उत्तरावरून त्या भागाचे त्याला आकलन झाले कि नाही त्याने पाठ करून लिहिले याचा अंदाज करणे कठीण आहे.
२.मूल्यमापन करण्यासाठी चाचण्या तयार करणे व त्याच्या परीक्षा घेणे यात वेळ खूप वाया जातो .
३.मूल्यमापनासाठी चाचाण्याची प्रती व परीक्षा घेतांना प्रश्न पत्रिकेची प्रती तयार करण्यात वेळ खूप वाया जातो.
४.साहित्य हाताळणे ,एखादी वस्तू तयार करणे अशा कौशल्याचे मापन होत नाही.

२.मूल्यमापन व विद्यार्थांचा सर्वकष विकास :
१.मूल्यमापन =संख्यात्मक + गुणात्मक वर्णन +शिक्षकांने दिलेला अभिप्राय .
२.मूल्यमापन = मापन + मुल्यानिर्णय .
३.विद्यार्थांच्या ज्ञानात्मक ,भावात्मक ,क्रियात्मक असे सगळ्या बाजूने केलेले मूल्यमापन म्हणजे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन होय.
४.सातत्यपूर्ण सर्वकष मुल्यामापानातून विद्यार्थांचा सर्वकष विकास घडून येतो.
५.विद्यार्थांना सर्वांगीण गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन होणे आवश्यक आहे.

३.सत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाची आवश्यकता :
१.सुनागारिकत्वाची जाणीव.
२.हक्का बदल जागरुकता.
३.कर्तव्याबद्दल तत्परता.
४.समाजाच्या विकासात क्रियाशीलपणा.
५.विविध गुणांचा एकत्रीकरण .

४.सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाचे फायदे:
१.विद्यार्थांच्या बौद्धिक विकासाचे मापन करण्याचा धोपट मार्ग म्हणजे परीक्षा आहे .विद्यार्थांत संख्यात्मक व गुणात्मक मूल्यमापन होणे आवश्यक आहे.
२.विद्यार्थांच्या मूल्यमापनाच्या कार्यात क्षमता पायाभूत आहेत म्हणून विद्यार्थांचे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन होणे आवश्यक आहे.
३.विद्यार्थांत अपेक्षित वर्तन बदल घडेपर्यंत मूल्यमापन करतात असे नाही कारण मूल्यमापन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे.
४.सातत्यपूर्ण सर्वकष मुल्यामापानामुळे विद्यार्थांचा शालेय विषयाबरोबर अनेक प्रकारच्या शालेय व सहशालेय उपक्रमातील सहभाग पाहता येतो.
५. सातत्यपूर्ण सर्वकष मुल्यामापानामुळे अध्ययन व अध्यापनाचा दर्जा उंचावतो व वस्तुनिष्ठ मूल्यमापन होण्यास मदत होते.
६. सातत्यपूर्ण सर्वकष मुल्यामापानामुळे विद्यार्थात हक्काबद्दल जागृता ,कर्तव्याबद्ल तत्परता,समाजाच्या विकासात क्रियाशील सहभाग घेता येतो म्हणून त्यांच्यात विविध मूल्य व गुण घडून येतात.

५. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाचे तोटे:
१.पालकांची उदासीनता: पालकांना आपला मुलगा डॉ.इंजिनिअर हवा आहे अशी अपेक्षा म्हणून केवळ बौद्धिक विकासावर भर असतो.
२.पालकांचे अज्ञान : ग्रामीण व अशिक्षित पालकांना शिक्षणाचे महत्व माहिती नाही.
३.शैक्षणिक साधनांची कमतरता: खेड्यातील सर्वच शाळेत हवे ते शैक्षणीक साधन उपलब्ध नाही त्यामुळे मूल्यमापन करतांना अडचणी येतात.
४.साधनाचा अपुरा उपयोग व अपुरे ज्ञान : शिक्षकांना साधन असून सुध्दा त्याचे वापर करण्याचे तंत्र माहित नसल्यास मूल्यमापन होणे कठीण आहे.
५.अनुधावानाचा अभाव: शासकीय योजनेतील इतर शालेय कामामुळे शिक्षकांना हवा तेवढा वेळ या मूल्यमापनावर देता येत नाही .कारण सध्या महाराष्ट्रातील अनेक शाळा ह्या दोन शिक्षकी आहेत.
६समाजाचा दृष्टीकोन : समाज फक्त विद्यार्थांच्या बौद्धिक विकासाचीच तुलना करतो फक्त परीक्षेत मिळालेले गुण लक्षात घेवून कोण हुशार असे ठरवल्या जाते.

९.कसोट्या लक्षणे व प्रकार

१.चांगल्या कसोट्याचे लक्षणे किंवा प्रकार :
१.विश्वसनीयता.
२.वस्तुनिष्ठाता.
३.सप्रमाणता.
४.उपयुक्तता.

२.कसोट्याची विश्वसनिता व ती पडताळण्याची पध्दती:
कसोट्याची विश्वसनिताप: ज्या कसोटीच्या साह्याने प्राविण्याचे तंतोतंत मापन होते व तोच मोजमाप वारंवार केले असता त्यात फारसा फरक पडत नाही त्याला विश्वसनीयता.
कसोट्याची विश्वसनिता पडताळण्याची पध्दती:
१.एकाच कसोटी दोन वेळा देणे.सहसंबंध गुणांक +०.९५ असावा.
२.दोन समांतर कसोट्याचा वापर .
३.एकाच कसोटीचे दोन समान भाग पडणे.

३.कसोटीच्या विश्वसनीयतेवर परिणाम करणारे घटक :
१.अंतर्गत घटक :
१.कसोटीत प्रश्नाची संख्या अधिक असावी .
२.कसोटी व्याक्तीभेद लक्षात घेऊन तयार करावी .
३.प्रश्न निसंदिग्द असावे.
४.प्रश्न समान घटकावर व समान उद्दिष्टावर आधारित असावे.

२.बाह्य घटक :
१.वातावरण निर्मिती .
२.परीक्षेची वेळ: परीक्षा सकाळी घेणे.
३.परीक्षा घेण्याच्या नियोजित वेळात पेपर घेणे.
४.मानसिक स्थिती .

४.कसोटीची वस्तुनिष्ठता व तिच्यावर परिणाम करणारे घटक :
कसोटीची वस्तुनिष्ठता: परीक्षक बदलला तरीही विद्यार्थांना एखाद्या कसोटीत मिळणाऱ्या गुणावर वाईट परिणाम होत नाही त्यास कसोटीची वस्तुनिष्ठता म्हणतात.
कसोटीची वस्तुनिष्ठतावर परिणाम करणारे घटक :

१.वस्तुनिष्ठ प्रश्नाचे प्रमाण अधिक असावे.
२.प्रश्नांची भाषा निसंदिग्द असावी.
३.योग्य प्रकारे गुणदान करावे.

५.कसोटीची सप्रमाणता व सप्रमाणता हे चांगल्या कसोटीचे लक्षण आहे.
कसोटीची सप्रमाणता: कसोटीतून ज्या गोष्टीचे मापन करायचे त्यात गोष्टीचे मापन होत असेल तर ती कसोटी सप्रमाण आहे.
कसोटीची सप्रमानता हे चांगल्या कसोटीचे लक्षण आहे:
१.आशयागत सप्रमाणता.
२.भविष्य कथनात्मक सप्रमाणता.
३.समवर्ती सप्रमाणता.
४.वृत्यात्मक व मनोवृत्ती सप्रमाणता .

६.सप्रमाणतेवर परिणाम करणारे घटक :
१.प्रश्नाची क्लिष्ट भाषा .
२.परीक्षेचे माध्यम :-मराठी ,इंग्रजी .
३.निकृष्ट दर्जाचे प्रश्न .
५.अनिश्चित प्रश्न .
६.वेळेची मर्यादा .
७.संदिग्द सूचना.
८.उद्दिष्टाचे असंतुलित प्रमाण .

७.कसोटीची उपयुक्तता:
कोणत्याही कसोटीचा वापर सहजतेने करता येणे त्यास कसोटीची उपयुक्तता म्हणतात.

८.कसोटी व त्याचे प्रकार :
कसोटी : व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या क्षमताची परीक्षा म्हणजे कसोटी होय.
कसोट्याची प्रकार :
१.बुद्धिमापन कसोट्या .
२.शालेय विषयातील प्राविण्य कसोट्या .
३.नैदानिक कसोट्या.
४.विशेष क्षमता कसोट्या.
५.भविष्य कथनात्मक कसोट्या.

९.प्राविण्य कसोटी व ती तयार करतांना लक्षात घ्यावाचे मुद्दे :
प्राविण्य कसोटी: वूद्यार्थांने विशिष्ट विषयाचे ज्ञान कितीपद संपादन केले आहे. हे पाहण्यासाठी प्राविण्य कसोटी वापरतात.
प्राविण्य कसोटी तयार करतांना लक्षात घ्यावाचे मुद्दे :
१.विद्यार्थांना काय येते आणि कितपद येते हे पाहण्यासाठी .
२.प्रा .कसोटीत नैदानिक कसोटी पेक्षा अधिक आशय भागावर प्रश्न काढावे लागतात.
३.प्रा .पुरेसा भाग शिकवून संपविल्यावर त्यावर विद्यार्थाने किती प्राविण्य संपादन केले हे पाहण्यासाठी वापरतात.
४.प्रा.कसोटी सोडण्यासाठी दिला जाणारा वेळ काटेकोरपणे पाळला जावे.

१०.नैदानिक कसोटी व ती तयार करतांना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी:
नैदानिक कसोटी : विद्यार्थांना दोषाचा शोध घेण्यासाठी ज्या साधनांचा व कसोटीचा वापर केला जातो त्यास नैदानिक कसोटी म्हणतात.
नैदानिक कसोटी तयार करतांना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी:
१.विद्यार्थांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी वापरतात.
२.विद्यार्थांना वर्ग अध्यापन करतांना निदान करावे लागते.
३.विद्यार्थांच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घ्यावे लागतात त्यासाठी मर्यादीत भागावर प्रश्न तयार करावे लागतात.
४.विद्यार्थांच्या समस्याचे निदान होईपर्यंत उपाय योजना करावी म्हणजे उपचारात्मक अध्यापन करावे.

११.उपचारात्मक अध्यापन :
उपचारात्मक अध्यापन करतांना शिक्षकांची भूमिका डॉक्टरची आहे.जसा.डॉक्टर आपल्याकडे येणाऱ्या रोग्यांना सारखे औषध देत नाही तर त्याचा आजार जाणून योग्य ते औषध देतो .त्या प्रमाणे विद्यार्थात सुध्दा अनेक अडचणी असतात .त्या वेगवेगळ्या आहे. त्या जाणून घेऊन सोडवणे यास उपचारात्मक अध्यापन म्हणतात.१२.इयत्ता १ ली च्या विद्यार्थी बेरीज करतांना हातचा घेतांना चुका करतो . त्यासाठी त्याच्या चूका दुरुस्त करण्यासाठी नैदानिक कसोटी तयार करा.
१. ३८ + १९ = ४१७ विद्यार्थांने आलेले उत्तर जसेच्या तसे लिहिले आहे.
२.२७ +१२ = ४९ विद्यार्थांने हातचा नसतांना ही एक अंक जास्त घेतला.
३.४८ + २९ = ६७ विद्यार्थी हातचा घेण्यास विसरला आहे.

१०.परीक्षा फलाचे पृथक्करण

१.प्राप्तांकाचा अर्थ लावण्याची पध्दती :
१.पालकांच्या मते संजयला गणितात ५२ गुण मराठीत ५६ व इंग्रजीत ४५ गुण पडले तेव्हा त्याने म्हटले की संजयला गणित व इंग्रजी पेक्षा मराठी चांगली मार्क पडले पण असे म्हणणे चुकीचे आहे पण पालकांच्या मते हा अर्थ योग्य आहे.
२.पण शिक्षकांने वर्गातील सर्व विद्यार्थांच्या गुणाचा विचार करून निष्कर्ष काढावा.
विषय : संजयचे गुण गणित ५२ ,मराठी ५६ ,इंग्रजी ४५. वर्गातील सर्वात जास्त गुण : गणित ६५,मराठी ६४,इंग्रजी ५०,वर्गातील सर्वात कमी गुण : गणित ४५ ,मराठी ४८ ,इंग्रजी ३६ . सरासरी गुण : गणित ५५ ,मराठी ५६ ,इंग्रजी ४३, शिक्षकांचा निष्कर्ष: गणित संजयला सरासरी पेक्षा कमी गुण आहेत, मराठीत संजयला सरासरी गुण आहेत, इंग्रजीत संजयला सरासरीपेक्षा जास्त गुण आहेत.

२.मापन पध्दती :
१.नामनिदर्शन श्रेणी : खेळाडूच्या पाठीवरील नंबर .
२.क्रमनिदर्शन श्रेणी : मापन पट्टीवरील १,२,३,मधील समांतर.
३.गुणोत्तर निदर्शन श्रेणी : २ गुण मिळालेल्या अर्चना पेक्षा ४ गुण मिळालेली मनिषा अधिक हुशार आहे हे चूक आहे.

३.पृथक्करण पध्दती :
१.गुणवत्ता क्रम पध्दती.
२.शत्तमक पध्दती .
३.शत्तमक क्रम .
४.इयत्ता प्रमाणके.
५.वयप्रमाणके .
गुणवत्ता क्रम पध्दती :
७६,७०,७०,७०,६५,५४,४५,४२,४२
२+३+४ /३ =३ यात ७० गुणांच्या ३ विद्यार्थांना
३ क्रमांक देणे.
८+९ /२ =८.५ यात ४२ गुणांच्या २ विद्यार्थांना ८.५ क्रमांक देणे.
गुणवत्ता क्रम : ७६=१,७०=३,७०=३,७०=३, ६५=५ ,५४=६,४५=७ ,४२=८.५,४२=८.५.

४.शततमक व शततमक क्रम यातील फरक :
१.एखाद्या श्रेणीतील प्राप्तांक क्रमाने मांडून त्या श्रेणीचे १०० समान भाग केले तर प्रत्येक भागात येणाऱ्या बिंदुला शततमक म्हणतात. व शततमक क्रम दिलेल्या गुण वितरणामध्ये एका विशिष्ट गुणाखाली शेकडा किती गुण आहेत हे दर्शाविणाऱ्या आकड्यास शततमक क्रम म्हणतात उदा-पी ० =३० गुण पी १००=८० गुण .
२.शततमका मुळे एखाद्या श्रेणीतील एखादा बिंदू दर्शिविला जातो. व शततमक क्रम वरून त्या बिंदू खाली शेकडा किती गुण प्राप्त आहेत हे दर्शिवले जाते.५.वयप्रमाणके व इयत्ता प्रमाणके यातील फरक :
१.निरनिराळ्या वयोगट नमुने घेऊन त्यांच्या क्षमतांचा विकास किती झाला हे पहिले जाते त्याला वयप्रमाणके म्हणतात व निरनिराळ्या इयत्तेतील विद्यार्थांचे नमुने घेतले जातात त्याला इयत्ता प्रमाणके म्हणतात.
२. वयप्रमाणके ज्या क्षमतांचा विकास वयानुसार होत नाही त्या क्षमतांच्या बाबतीत ही प्रमाणके उपयुक्त ठरत नाही व इयत्ता प्रमाणके कोणत्याही दोन लगतच्या वर्गामध्ये होणारी प्रगती समान असते असे नाही.
३. वयप्रमाणके फक्त १५-१६ वयोगट पर्यंत वापरता येतात व इयत्ता प्रमाणके सर्व इयत्तेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या विषयापुरती मर्यादित असतात.६.परीक्षा फलकांचे पृथक्करण (विश्लेषण ) ची आवश्यकता /उपयुक्तता:
१.परीक्षा फलाचे पृथक्करण करतांना संदर्भ लक्षात घ्यावे लागतो.
२.विद्यार्थी विशिष्ट विषयात किती प्रगत व कच्चा आहे हे कळते.
३.अध्यापनातील त्रुटी समजून विद्यार्थांना योग्य मार्गदर्शन करता येते.
४.विद्यार्थात अपेक्षित वर्तन बदल घडवून आला किंवा नाही हे कळते.

७.परीक्षा फलकांचे सादरीकरण :
१.सोपी भाषा वापरून मुद्दे स्पष्ट करणे.
२.विद्यार्थांनी मिळालेल्या गुणांचे विश्लेषण.
३.परीक्षा संपल्यानंतर परीक्षा फलजाहीर करणे आवश्यक .
४.विद्यार्थांच्या विकासाचे चित्र स्पष्ट होते.

9 comments:

 1. अतिशय महत्वपूर्ण माहिती मिळाली. धन्यवाद सर.

  ReplyDelete
 2. Sir , really nice work. Keep it up. Wish you all the best.

  ReplyDelete
  Replies
  1. खूप खूप धन्यवाद सर

   Delete
 3. अतिशय सुंदर !
  खूप महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल संबंधित सर्व लोकांचे मनापासून धन्यवाद

  ReplyDelete
 4. उपयुक्त माहिती धन्यवाद सर

  ReplyDelete
 5. खूप खूप धन्यवाद सर

  ReplyDelete