युनिकोड चा मराठी भाषेत वापर
युनिकोड म्हणजे काय?

युनिकोड हे १६ बिट वैश्विक कॅरेक्टर एनकोडिंग मानक आहे.याचा वापर प्रामुख्याने बहुभाषिक सॉफ्टवेअरचा विकास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेकडून होतो.युनिकोड मानकामध्ये जगातील सर्व लिखित भाषांची सर्व कॅरेक्टर्स एनकोड करण्याची क्षमता आहे.युनिकोड मानकामध्ये प्रत्येक कॅरेक्टरला विशिष्ट सांख्यिक मूल्य आणि नाव दिले जाते.युनिकोड मानक व आयएसओ १०६४६ मानकाची एक विस्तारित यंत्रणा आहे जिला यूटीएफ-१६ म्हणतात ज्यामध्ये जवळपास दहा लाख कॅरेक्टर्सचे एनकोडिंग करता येते.


एक्सेल फाईल युनिकोडमध्ये कशी कन्व्हर्ट कराल ?


a) प्रथम एक्सेल फाईल टेक्स्ट(.txt) स्वरूपात साठवा.
b) ISM मधील Converter हा पर्याय निवडा.
i) टेक्स्ट(.txt) फाईल बदलणे
(1) प्रथम ISM मधील Converter (बदलणे) हा पर्याय निवडा.
(2) मराठी भाषा हा भाषेमधून पर्याय निवडा.
(3) Input format मधून Bilingual हा पर्याय निवडा.
(4) आपणास Convert करावयाची फाईल (दस्तावेज) उघडा.
(5) Output format मधून युनिकोड हा पर्याय निवडा.
(6) Convert (बदल) झालेली फाईल (दस्तावेज) साठवण्यासाठी आपणास हवे असलेले नाव देऊन हव्या त्या ठिकाणी साठवा.
(7) Convert वर क्लिक करा.
(8) Convert (बदल) झालेली फाईल(दस्तावेज) एक्सेल मध्ये उघडा

 पॉवर पाईंट(POWERPOINT)प्रेझेन्टेशन युनिकोड मध्ये कसे कन्व्हर्ट कराल ?


a) प्रथम पॉवर पाईंट (PowerPoint) मधील टेक्स्ट (text) कॉपी करा.
b) ISM मधील Converter हा पर्याय निवडा. 
c) टेक्स्ट (text) बदलणे
i) आपणास हवा असलेला टेक्स्ट (text) ISM Converter user interface मधून निवडा.
ii) मराठी भाषा हा भाषेमधून पर्याय निवडा 
iii) Input format मधून Bilingual हा पर्याय निवडा.
iv) आपणास हवा असलेला टेक्स्ट (text) इनपूट टेक्स्ट (Input Text) मध्ये लिहा. 
v) Output format मधून युनिकोड हा पर्याय निवडा 
vi) convert (बदलणे) वर क्लिक(टिचकी) करा 
vii) नंतर convert (बदल) झालेला टेक्स्ट (text) नवीन पॉवर पाईंट (PowerPoint) पानावर paste करा

 DVB-TT फॉन्ट डेटा युनिकोडमध्ये कसा कन्व्हर्ट कराल?


1. प्रथम वर्ड डॉक्युमेंट उघडा.
2.नंतर Add-Ins वर जा. 
3.ISM button वर क्लिक करा.
4.convert हा पर्याय निवडा.
5.Convert To मध्ये युनिकोड हा पर्याय निवडा.
6.convert बट्टन वर क्लिक करा.

No comments:

Post a comment