ऑनलाइन शिष्यवृत्ती

शासकीय ऑनलाइन शिष्यवृत्ती 


ऑनलाइन शिष्यवृत्ती मार्गदर्शिका

ऑनलाइन शिष्यवृत्ती PPT

Maha DBT Flipbook

MahaDBT पोर्टल विशेष*
••••••••••••••••••••••••••••••••
नमस्कार,
आपणा सर्वांना माहीत आहे की यावर्षी पासून सर्व शिष्यवृत्तीचे फॉर्म (अल्पसंख्यांक प्री मॅट्रिक सोडून) हे आपणास MahaDBT पोर्टल वर ऑनलाईन भरायचे आहेत
     त्यासाठी काही महत्वाच्या सूचना

💥आपण भरणार असलेला शिष्यवृत्ती फॉर्म हा आधार आधारित असल्याने आधार कार्डवरील खालील माहिती ही अचूक असणे गरजेचे आहे अन्यथा आधार कार्डवरील माहिती त्वरित बदलून घ्यावी.

💥 विद्यार्थ्यांचे नाव:-
      आधार कार्डवरील विद्यार्थ्यांचे नाव व शाळेतील नाव हे एकच असणे गरजेचे आहे.

💥 जन्मतारीख :-
     मुलाची जन्मतारीख सुद्धा शाळेतील व आधार कार्डवरील एकच असावी. व जन्मतारीख ही DD/MM/YYYY या फॉरमॅट मध्येच असावी.

💥पत्ता व लिंग :-
          मुलाचे फॉर्म भरत  असतांना आधार नुसार माहिती आटोमॅटिक येत असल्याने विद्यार्थ्यांचा पत्ता व त्याचे लिंग हे सुद्धा अचूक असणे गरजेचे आहे.

💥 मोबाईल क्रमांक :-
      आपल्या आधार क्रमांकाशी मोबाईल नंबर हासुद्धा  लिंक केलेला असावा . आधार क्रमांकाशी मोबाईल नंबर लिंक नसेल तर विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करतांना आपल्याला OTP प्राप्त होणार नाही. त्यामुळे त्यांचे रजिस्ट्रेशन पूर्ण होऊ शकणार नाही.

💥 बोटांचे ठसे (बायोमेट्रिक नोंदणी ):-
             काही जणांनी मुलांचे आधार कार्ड हे मूल लहान असतांनाच काढलेले आहे त्यावेळी त्यांनी आई किंवा वडिलांचे बोटांचे ठसे नोंदविलेले आहे.
      त्यामुळे अशा मुलांचे बायोमेट्रिक पद्धतीने रजिस्ट्रेशन करतांना मुलांचे बोटांचे ठसे जुळणार नाही.
      त्यासाठी मूल पाच वर्षांचे झाल्यानंतर त्याचे बोटांचे ठसे सुद्धा अपडेट करून घेणे गरजेचे आहे.

      एकंदरीत , विद्यार्थ्यांचे आधार कार्डवरील संपूर्ण डिटेल्स हे अचूक असणे गरजेचे आहे.

💥 बँक खाते:-
       शिष्यवृत्तीचे फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांचे स्वतःचे किंवा विद्यार्थी व पालक यांचे राष्ट्रीयीकृत बँक खाते असणे गरजेचे आहे.
        महत्वाची गोष्ट म्हणजे या बँक खात्यासोबत सुद्धा  आधार क्रमांक लिंक केलेला असणे आवश्यक आहे.
      आपल्या बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक नसेल तर आपल्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम डायरेक्ट ट्रान्सफर करता येणार नाही.

💥 आवश्यक कागदपत्रे :-
       MahaDBT पोर्टलवर विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करतांना खालील डाकूमेंटस आवश्यक आहेत.
 1) ओळखीचा पुरावा :-
           फोटोसह शाळेचे प्रमाणपत्र / रेशनकार्ड
2)  पत्ता तपशील :-
    आधारकार्ड/ रहिवाशी दाखला / बँक पासबुक
3) जन्म तपशिल :-
          जन्म प्रमाणपत्र / फोटोसह शाळेचे प्रमाणपत्र
4) संबंध तपशिल :-
      रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र
5)  बँक खाते झेरॉक्स
6) विद्यार्थ्यांचा एक फोटो

     वरील सर्व डाकूमेंटस ही JPG / PNG/ Tiff / PDF या फॉरमॅट मध्ये स्कॅन करून अपलोड करावी लागतात . स्कॅन केलेल्या डाकूमेंटस ची फाईल साईज ही 256 kb पेक्षा कमी असावी.

  वरील सर्व माहिती नीट समजून घेतल्यास विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करण्यास सोपे होईल.

💥 अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या कामगारांच्या पाल्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
   विद्यार्थी रजिस्ट्रेशन साठी वरील कागदपत्रे ही आवश्यक आहेतच. शिवाय फॉर्म भरण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
   
 1) वडील / विद्यार्थी अधिवास (रहिवासी ) प्रमाणपत्र
2) मागील वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
3) अपंग असेल तर अपंगत्व प्रमाणपत्र
4) वडील / विद्यार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र
5) वडील किंवा आईचे अस्वच्छ व्यवसाय करीत असल्याचे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
6) 20 रु.च्या स्टॅम्पवर पालक अस्वच्छ व्यवसाय करीत असल्याचे पालकाचे स्वयं घोषणा पत्र
7) मागील वर्षाची गुणपत्रिका

     अस्वच्छ शिष्यवृत्तीचा फॉर्म हा कोणत्याही जातीचा विद्यार्थी भरू शकतो फक्त त्याचे पालक अस्वच्छ व्यवसाय करणारे असावेत

No comments:

Post a comment