विद्यार्थी पोर्टल मदत

सरल मदत केंद्र
STUDENT PORTAL

आपल्या शेवटच्या वर्गातील विद्यार्थी रिक्वेस्ट अप्रूव कशा कराव्यात याबाबत विडियो डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा.


LAST CLASS STUDENTS REQUEST APPROVE


_____________________________________________________


Students Portal मधील विद्यार्थी नवीन वर्गात प्रमोट करण्यासाठी मार्गदर्शक विडियो पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.


Students Pramotion 


_______________________________________________________

आधार कार्ड माहिती दुरुस्त कशी करावी यासाठी येथे क्लीक करा.

_____________________________________________________

सरल मधे नवीन प्रवेशित विद्यार्थी ( इ.1 ली ) माहिती कशी भरावी  व अपलोड करावी  याबाबत मार्गदर्शक विडियो व संपूर्ण महितीपुस्तिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

 

______________________________________________________

सरल नवीन प्रवेशित विद्यार्थी नोंदणी मार्गदर्शिका


सरल इयत्ता 1 ली च्या विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी office setup व सूचना


This excel file can be opened in 'Microsoft Office (Excel)' version 2003,2007,2010 or 2013 

setup for  Microsoft Office 2003, 


following steps are follow

1) Navigate to 'Tools' tab > 'Macro' > 'Security'.

2) Click on 'Security' option. A Security window will open.

   It will show you all the security levels that you can select for your macros.

3) Select 'Low' Option - This setting allows all macros to run. 


Setup for Microsoft Office 2007


1) With an excel file opened click on the 'Office' button.

2) Click on 'Excel Options' (present at the bottom).

3) Select the 'Trust Center' > 'Trust Center Settings'.

4) Click on the 'Macro Settings'. Choose the security level for running macros.

5) Enable all macros (not recommended, potentially dangerous code can run)

OR

1) When you open an excel file in security warning pop-up for enable macro, click > Option

2) Select Enable Content and press OK 

Setup for Microsoft Office 2010 and 2013


1) Open a Microsoft Excel file, and navigate to 'File' > 'Options' > 'Trust Center'.
   Click 'Trust Center Settings'

2) Select the 'Macro Settings' option.

3) Choose the security setting that you want to be applicable on macro execution.

4) Enable all macros (not recommended, potentially dangerous code can run)

OR

1) When you opening an excel file their is one security warning pop-up for enabable macro,
   click > Enable Content 

2) Then select Eanble Content and press OK 

After opening the excel file you will get 

'Visual Form' for student data entry.
Form will have button as 'Insert','Update' and 'Delete'

***** INSERT *****


1) Click on insert button to add students in the list.

2) To fill all rhe fields properly and click on SAVE, a record will be save in excel
   file.

***** UPDATE *****


1) Click on update button to update the information for students already inserted.

2) Select General Register Number and click on 'Get Data' button.

3) Edit the information / fields as required.

***** DELETE *****


1) Click on delete button to delete students record.

2) Select General Register Number and click on 'Get Data' button.

3) Students information entered will be displayed on the form.

4) Click on 'Delete' to delete record in excel file. 


Select division number as,

Stream Division No. Division Medium
Not Applicable 1 A Marathi

Enter data for all students in the standard and then only upload the excel sheet.

***** DO NOT *****


1) Use any other excel sheet for data entry.

2) Use the sheet for another standard or another school.

3) Enter any invalid or garbage data.

4) Rename the file name.Example:


General Register No.: 12344567
Stream: Not Applicable
Academic Year: 2016-2017
Standard: 1st Standard
Division: 1
Student's First Name: Aditya
Student's Middle Name: Pravin
Student's Last Name: Patil
Date of Birth: 11-08-2009
Gender: Male
Mother's First Name: Sima
Mother's Middle Name: Pravin
Mother's Last Name: Patil
UDISE Number: 27251111199
Meduim: Marathi
Semi English: No
Date of Admission: 16-06-2016
Standard of Admission: Senior KG (1 Year Before 1st Std)
Admission Type: Regular
UID Number: 123456789012
______________________________________________________
        Students Portal मधील सन 2016_17 मधील विद्यार्थी 2017-18 मधे प्रमोट करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

Students Pramotion 2017-18

______________________________________________________

नमस्कार मित्रांनो ,सध्या संकलित चाचणी 2 चे भाषा व गणित विषयांचे गुण सरल पोर्टल मधे अपलोड करण्याचे काम चालू आहे. याबाबत बऱ्याच मित्रांच्या अडचणी लक्षात घेवून हा मार्गदर्शक वीडियो तयार केला आहे. आपण हा विडियो लक्षपूर्वक पाहिला तर आपणास गुण भरण्यास कोणतीही अडचण येणार नाही अशी खात्री वाटते. विडियो डाउनलोड करण्यासाठी खालील लोगो वर क्लीक करा व open with म्हटल्यावर crome अथवा दूसरा ब्राउज़र सिलेक्ट करा.

____________________________________________________

          सरल पोर्टल अंतर्गत उपस्थिती व सेल्फी अपलोड App डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.

         उपस्थिती App डाउनलोड

टिप: सुरुवातीला App install व्हायला वेळ लागत असल्यास फोन मधील flight mode एकदा On करून पुन्हा Off  करा.

विद्यार्थी उपस्थिती व सेल्फी अपलोड App वापर सूचना

1) अँप रजिस्टर करण्यापूर्वी master➡create teacher user मधून बदलीझालेल्या शिक्षकांचे नाव डिलिट व नवीन आलेल्या शिक्षकांचे नाव अँड करावे व त्यानंतर maintainance➡ assign classteacher मधून इयत्तावार वर्गशिक्षक assign करावे..

2) पूर्वीचे वर्गशिक्षक remove करण्यासाठी maintainance➡assign class teacher➡click on specific class➡ click remove
आणि त्यानंतर नवीन अँड केलेल्या शिक्षकांना त्यांच्या वर्गावर assign करण्यासाठी
maintainance➡assign class teacher➡select standard ➡assign
______________________________________________________

नमस्कार मित्रांनो ,सध्या सरल मधे स्कूल पोर्टल ची माहिती भरण्याचे काम चालु आहे.ही माहिती भरण्यासाठी आपण आपल्या पोर्टल ला login करून खालील बाजूला दिलेल्या chek list या tab वर क्लीक करून आपण गेल्या वर्षी भरलेली माहिती आपल्या मोबाईल वर  सेव करू शकता .अथवा प्रिंट काढू  शकता. या प्रिंट वरच आपण या वर्षी आपनास कोणती दुरुस्ती करायची याची नोंद योग्य त्या रकान्यात केल्यास प्रत्यक्ष माहिती भरण्याच्या वेळेस आपले काम जलद व सोपे होईल.

     सरल मधे स्कूल पोर्टल ची माहिती भरण्यासाठी प्रत्येक मुद्देनिहाय मार्गदर्शीका, ऑफलाइन माहिती कशी भरावी याबाबत संपूर्ण मार्गदर्शिका व माहिती भरण्यासाठी आवश्यक असणारे कच्चे टिपण pdf file डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.

Students Portal App डाउनलोड करणे App Setup तसेच App द्वारे विद्यार्थ्यांची दैनंदिन हजेरी कशी भरावी या संबंधी संपूर्ण मार्गदर्शिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.


______________________________________________________

school पोर्टल माहिती भरताना आपल्या गेल्या वर्षीच्या माहितीची cheak list कशी डाउनलोड करावी याबाबत विडिओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा.

                    स्कूल पोर्टल चेकलिस्ट डाउनलोड

______________________________________________________

   
     School पोर्टल ऑफलाइन माहिती भरणे संपूर्ण मार्गदर्शिका

______________________________________________________

     
       School  पोर्टल माहिती भरण्यासाठी आवश्यक कच्ची माहिती तक्ते

_______________________________________________

शाळा संचमान्यता 2016 बाबत ऑनलाइन माहिती पोर्टल मधे कशी भरावी याबाबत मार्गदर्शन व संपूर्ण मार्गदर्शक सूचना मार्गदर्शिका डाउनलोड करण्यासाठी खालील 

______________________________________________________

Students Catalogue ची Pdf file बनविन्यासाठी मार्गदर्शक वीडियो डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.

   Students Catlouge pdf file तयार करणे Video

____________________________________________________

विद्यार्थी आधार कार्ड माहिती स्टूडेंट्स पोर्टल वर मोबाईल वरुन कशी भरावी यबाबतचा मार्गदर्शक वीडियो डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

सरल विद्यार्थी आधार कार्ड माहिती मोबाईल वरुन भरणे वीडियो डाउनलोड


नमस्कार मित्रांनो चालु वर्षी आपला सर्व शालेय डाटा सरल डाटाबेस प्रणाली मधे अपलोड करायचा असल्याने आपल्याला खूप माहिती गोळा करावी लागते .तसेच बरेच वेळा अडचणी येतात ,अशा बऱ्याच बांधवांचे फोन येतात यावर उपाय म्हणून मी हे मदत केंद्र चालु करत आहे .यामधे सरल बाबत नवीन अपडेट व माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे.आशा आहे याचा आपणास लाभ होईल .
टिप:आपणास सरल बाबत नवीन अपडेट काळावेत हा या पेज मागचा उद्देश आहे ,येथील एखादी माहिती जूनी / चुकीची असू शकते.त्याबद्दल संकेतस्थळ जबाबदार राहणार नाही.संदिग्ध महितीबद्दल शासनाच्या अधिकृत वेब वरुन खात्री करावी.

  सरल प्रणाली students Portal मधे विद्यार्थ्यांचे आधार कार्ड माहिती अपलोड करण्याची पद्धती विषयक संपूर्ण मार्गदर्शक     महितीपुस्तिका डाउनलोड करण्यासाठी खालील अॅरोवर क्लीक करा.

 

_______________________________________________

_नमस्कार मित्रांनो, सध्या सरल मधे विद्यार्थी आधार कार्ड माहिती भरण्याची घाई आहे. सर्वजण माहिती भरण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. जवळजवळ सर्व शिक्षकांकडे android मोबाईल असल्याने शिक्षक सरल ची बरीच माहिती भरण्याइतके समृद्ध झाले आहेत ही नक्कीच भूषणावह बाब आहे_

     

        *आधार मधील माहिती  exell शीट  मधे भरायची असल्याने व फाइल प्रकार बदलायचा असल्याने ही कीचकट प्रक्रिया मोबाईल वर जमणार नाही असे  मलाही  वाटत होते .परंतु हे मोबाईल वरुन जमल्यास लोकांना फायदा होईल या दृष्टीने मी प्रयत्न केले व ते यशस्वी झाले.आता आपण ही माहिती अगदी सहजपणे मोबाईल वरुन भरू शकता व त्यासाठी आपणास exell मधील जास्त ज्ञान असण्याची मुळीच आवश्यकता नाही.*


                     ♻ *पद्धती*♻


➡_*यासाठी सर्व प्रथम आपल्या मोबाइल मधे WPS Office नावाचे android app असणे आवश्यक आहे आपल्याकडे ते नसल्यास play store वरुन डाउनलोड करून घ्या.*_


➡ *यानंतर https://student.maharashtra.gov.in/*

*या वेबसाईट वर जावून आपल्या शाळेचा udise व पासवर्ड टाकून log in करा*


➡ *आता आपणाला तेथे इतर tab बरोबरच excell नावाचा tab दिसेल त्यावर क्लीक करा. त्यावर आपणास downoad UID व Upload UID असे दोन tab दिसतील त्यापैकी download UID tab वर क्लीक करा.व आपणाला माहिती भरवायाच्या इयत्ता चे फाइल डाउनलोड करून घ्या.*


➡ *आता आपण डाउनलोड केलेल्या file मधे offline माहिती भरू शकता. ही माहिती भरताना आपणाला ती फाइल WPS Office या सॉफ्टवेयर मधून उघडावी लागेल. wps office मधून फ़ाइल उघडल्यावर त्यामधे विद्यार्थ्यांचा आधार नंबर, नाव ,जन्मतारीख व लिंग याबाबत माहिती भरायची आहे त्या cell दिसतील .*


 ➡ *त्यातील सुरवातीला आधार नंबर सेल वर क्लीक करा व edit करा. आता आपल्या मोबाईल वर आडवा बॉक्स येईल त्यामधे  विद्यार्थ्याच्या नावासमोर आधार नंबर भरा व पुढल्या cell वर जाण्यासाठी tab या बटनावर क्लीक करा.लक्षात ठेवा tab हे बटण प्रेस केले की आपण पुढील cell वर जावू शकतो त्यामुळे माहिती भरण्यास अजिबात अडचण नाही. लिंग बाबत माहिती भरताना रिकाम्या जागेत केवळ प्रेस करा व येणाऱ्या पर्यायातून लिंग निवडा.अशाप्रकारे आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती शीट मधे भरा.*


 ➡ *शीट मधे माहिती भरल्यावर वरील बाजूस असलेल्या file या tab वर क्लीक करा. खाली save as ऑप्शन येईल त्यावर क्लीक करा. आता आपणास फाइल कोणत्या फोल्डर मधे ठेवायाची आहे त्याचे ठिकाण निवडा व save बटानाजवळील कर्सर वर क्लीक करा . तेथे आपणास बरेच फाइल प्रकार दिसतील . त्यापैकी .CSV हा प्रकार निवडा व save या tab वर क्लीक करा.*


➡ *आता आपणास ही फाइल upload करायची आहे त्यासाठी परत students portal ला login करा.exell tab ला क्लीक करून Upload file वर क्लीक करा. व आलेल्या पर्यायातील  documents वर क्लीक करा. आता आपण फ़ाइल कोणत्या फोल्डर मधे सिलेक्ट केली आहे.त्या फोल्डर मधे जावून फाइल ला फ़क्त क्लीक करा. फाइल आपल्या पोर्टल वर आलेली असेल. आता upload tab वर क्लीक करा. तुमची फ़ाइल upload होईल .तुम्ही किती विद्यार्थ्यांची माहिती भरली त्याबाबत Students upload Successfully  असा मेसेज आपणास तेथेच पहावयास मिळेल. असा मेसेज दिसला तर आपली माहिती यशस्वीरित्या भरली गेली असे समजावे.*


     _*नंतर report tab वरुन Students Uid details वर क्लीक करून आपण आपल्या माहितीची खातरजमा करु शकता.*_


      सर्वांना माहिती भरण्यास शुभेच्छा.....!


_*काही अडचण आल्यास वैयक्तिक मेसेज केला तरी चालेल*_


      *आपला मित्र:  रवी भापकर*

        *जामखेड जिल्हा अहमदनगर*

          फोन: 9423751727

_______;_______________________________________

   ♻ *सरल आधार कार्ड माहिती अपडेट्स*♻

   _मित्रांनो, मोबाईल द्वारे सरल स्टूडेंट्स पोर्टल आधार माहिती पोस्ट नुसार खुप बांधवांनी प्रयत्न करून माहिती अपडेट केली आहे. परंतु काही जणांना अजूनही काही अडचणी आहेत._

*काल दिवसभर शिक्षकांना जास्तआढळूनआलेलीअडचण म्हणजे ........*

*फाइल अपलोड करताना ...File Name is to Longer than .... किंवा फाइल नाव जुळत नाही. याविषयी लोकांना अडचणी आहेत.*

    _*मित्रांनो , ही अडचण येन्याचे कारण म्हणजे तुम्ही सदर इयत्ताच्या एकापेक्षा जास्त फ़ाइल डाउनलोड केल्या असल्याने तुमच्या मोबाइल मधे त्याच नावाच्या दोन फाइल राहु शकत नाहीत त्यामुळे तुमचे मोबाईल मधील सॉफ्टवेअर त्याला आपोआप rename करते.त्यामुळे नंतर च्या फाइल पुढे (1)..(2). अशा प्रकारचे अंक येतात त्यामुळे फाइल चे मूळ नाव बदलते व आपली फाइल अपलोड होण्यास अडचण येते. त्यामुळे csv फॉर्मेट मधे फाइल save करताना अगोदर आपल्या मोबाईल मधील त्या इयत्ता ची जूनी फाइल  डिलीट केल्याची खात्री करा. व फाइल च्या शेवटी  (1)  यासारखे अंक आल्यास ते डिलीट करा व फ़ाइल .csv मधे कन्वर्ट करा व नंतर ती फ़ाइल अपलोड करा म्हणजे अडचण येणार नाही.
______________________________________________________

  ♻ *सरल आधार कार्ड माहिती अपडेट्स*♻
     
        *सरल स्टूडेंट्स  पोर्टल वर आधार कार्ड माहिती मोबाईल वरुन भरण्याविषयी मार्गदर्शनानुसार अनेक बांधवांचे माहिती भरण्याचे काम पूर्ण झाले आहे. कालची file name longer हीच समस्या सगळ्यांना जास्त होती ती कालच्या पोस्ट मुळे बऱ्याचअंशी सुटली आहे.*
       _*परंतु जे शिक्षक नवीन आहेत व प्रयत्न करून पहात आहेत त्यांना नवीनच समस्या येत असल्याचे कालच्या फोन/ मेसेज नुसार आढळले. ती समस्या ही की पोर्टल वरुन फाइल डाउनलोड केल्यावर WPS Office मधे फाइल उघडताना error येत आहे. अशावेळी play store वरुन आपले wps office App अपडेट करून घ्या.*_
 
       *तसेच बऱ्याच जणांना WPS Office मधे माहिती भरल्यानंतर file save करताना file option सापडत नाही असे जाणवले.अशावेळी माहिती भरुन पूर्ण झाल्यावर खाली जे tools ऑप्शन आहे त्यावर क्लीक करा म्हणजे आपल्याला फाइल tab दिसेल*
 
       

   ______________________________________________________          
        सरल प्रणालीमधुन विद्यार्थी ट्रांसफर कसा करावा याबाबत महितीपुस्तिका डाउनलोड करण्यासाठी खालील इमेजवर क्लीक करा . 
https://drive.google.com/uc?export=download&id=0B0W3lz2xZNshMTVzZmVsNGZ3SVE
खालील लिंकवर क्लीक करून आपण विद्यार्थी ऑनलाइन ट्रान्सफर करु शकता.


सरल विद्यार्थी ट्रान्सफर


सरल माहिती लिंक
4)बँक IFSC/MICR कोड शोधा 

5)कोणत्याही शाळेचा U DISE शोधा

6) इयत्ता निहाय वेळापत्रक 

सरल बाबत अडचण आल्यास संपर्क

E-mail:support.education@maharashtra.gov.in
Help Line support. 18002330700
Help Line support. 18002330800
Timing: 08:00 AM - 08:00 PM (OnlyWorkingDay's)
__________________________________________________________________________________________________________⌚⌚ सरल ताजे अपडेट्स ⌚⌚

💻 SARAL UPDATES 💻

*स्टूडंट पोर्टल*

1) 2015-16  मध्ये आपण स्टूडंट पोर्टल ला भरलेली विद्यार्थी माहिती शासनाने ग्राह्य समजून संच मान्यता साठी अधिकृत माहिती म्हणून समजली आहे आणि या आधारे संच मान्यता देखील करण्यात आलेली आहे.त्यामुळे सरल बाबत शासन किती गांभीर्याने विचार करत आहे हे एव्हाना आपल्या सर्वांच्या लक्षात आलेले असेलच.
त्यामुळे या पोस्ट मधील पुढील माहिती सर्वांनी गाम्भीर्यपूर्ण वाचावी ही विनंती.. जेनेकरून याआधी झालेल्या चुका पुन्हा होणार नाही हे सर्वांनी लक्षात घ्यावे.

2) स्टूडंट पोर्टल च्या वेबसाइट ला लॉगिन करण्यासाठी आता *http://student.maharashatra.gov.in* या लिंक द्वारे लॉगिन करावे लागेल ही महत्वाची बाब सर्वांनी लक्षात घ्यावी.

3)स्टूडंट पोर्टल च्या पहिल्या फेज मधील पहिल्या भागात आपण सर्वांनी आपल्या विद्यार्थ्यांची माहिती भरलेली आहेच.आता पहिल्या फेज मधील दुसऱ्या भागात या आधी भरलेल्या विद्यार्थ्यांची माहिती आपणास अपडेट करावयाची आहे.या मध्ये सर्वप्रथम विद्यार्थी ट्रान्सफर करने ही प्रोसेस पूर्ण करने अपेक्षित आहे.

4)मागील वर्षी स्टूडंट पोर्टल मध्ये काम करतानाच्या पासवर्ड ने आपण पुन्हा लॉगिन करावयाचे आहे.जर आपण तो पासवर्ड विसरला असाल तर सर्वप्रथम तो पासवर्ड पुन्हा रिसेट करुण घेणे गरजेचे आहे.त्यासाठी आपणास पोर्टल मध्ये तो पासवर्ड रीसेट करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.हां पासवर्ड रीसेट करताना आपनास जी मुख्याध्यापकाची *जन्मतारीख* भरलेली आहे ती  माहिती असने गरजेचे आहे याची नोंद घ्यावी.या वेळी पासवर्ड हा मोबाइल नंबर वर न येता कॉम्पुटर स्क्रीन वरच नव्याने रीसेट करण्याची सुविधा उपलब्ध करुण देण्यात आलेली आहे.

5) *विद्यार्थी ट्रान्सफर करणे* :

आपल्या शाळेतील काही विद्यार्थी इतर शाळेत शिकन्यासाठी गेले असेल अथवा आपल्या शाळेत इतर शाळेचे विद्यार्थी शिकन्यासाठी आलेले असतील.अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपणास सरल स्टूडंट पोर्टल मध्ये काम करावयाचे आहे हे लक्षात घ्यावे.ज्या शाळेत या पूर्वी सरल मध्ये नोंद केलेल्या विद्यार्थी व्यतिरिक्त एकही विद्यार्थी नविन आलेला नसेल किंवा आपला एकही विद्यार्थी इतर शाळेत शिकण्यासाठी गेला नसेल अशा शाळेच्या मुख्याध्यापकाने सध्या स्टूडंट पोर्टल ला कोणतेही काम करावयाचे नाहे हे सर्वप्रथम लक्षात घ्यावे.

  आता स्टूडंट पोर्टल ला काम करताना शाळांनी  कसे काम करावे हे समजून घेऊ..
  
समजा A शाळेचा विद्यार्थी हां B शाळेत शिकन्यासाठी गेला असेल अशा विद्यार्थी संदर्भात B शाळानी A शाळेला सदर विद्यार्थी माहिती  ऑनलाइन ट्रान्सफर करण्याची विनंती *TRANSFER REQUEST* हां फॉर्म भरून करायची आहे.या साठी आपणास विद्यार्थयाच्या जुन्या शाळेचा udise नंबर माहिती असने गरजेचे आहे.माहिती नसेल तर तो नंबर आणि नाव शोधण्यासाठी तेथे सर्च ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.विद्यार्थी माहिती ट्रान्सफर करण्याची विनंती B शाळा करत असताना तेथे एक जुजबी माहीती असलेला विनंती फॉर्म आपणास भरावयाचा आहे..ही विनंती केल्यावर सदर रिक्वेस्ट A शाळेला जाईल.तसा sms देखील A शाळेच्या मुख्याध्यापकाच्या रजिस्टर मोबाइल क्रमांकावर पाठवला जाईल.A शाळा ही विनंती पाहण्यासाठी *Request confirmation* या मेनू ला क्लीक करेन.आता A शाळा खात्री करेल की आपणास आलेली विनंती ही रास्त आहे किंवा नाही.जर सदर विनंती रास्त असेल तर A शाळा या विनंतीला ग्राह्य समजून या विनंतीला *confirmation* म्हणजेच मान्यता   सदर विद्यार्थी माहिती B शाळेला ट्रान्सफर झालेला असेल.B शाळा या विद्यार्थयाची आलेली माहिती अपडेट करण्याचे काम त्वरित पूर्ण करून घेतील अशा सूचना देण्यात आलेल्या आहे.अपडेट करताना B शाळा या ट्रान्सफर झालेल्या विद्यार्थयाची शिकत असलेली *नविन इयत्ता,तुकडी,जनरल रजिस्टर नंबर,आणि या शाळेत दाखल दिनांक 'अपडेट'*  या ऑप्शन मध्ये जाउन करेल याची नोंद घ्यावी.जोपर्यंत A शाळा सदर विद्यार्थी ट्रान्सफर कन्फर्म करत नाही तोपर्यंत B शाळेला तो विद्यार्थी अपडेट साठी दिसणार नाही हे लक्षात घ्यावे

6) अपवादात्मक परिस्थितीत असेही होऊ शकेल की B शाळेने ट्रान्सफर साठी पाठवलेली रिक्वेस्ट ही A शाळेच्या मुख्याध्यापकास मान्य नसेल तर अशा मुख्याध्यापकाने काय करावे? 
अशा वेळी A शाळा ही रिक्वेस्ट रिजेक्ट करू शकणार नाही याची नोंद घ्यावी.जुन्या शाळानी आलेली रिक्वेस्ट ही तशीच राहु द्यावी.ही रिक्वेस्ट 7 दिवसाने आपोआप A शाळेच्या *BEO* म्हणजेच *गटशिक्षनाधिकारी* यांच्या लॉगिन ला जाईल.अशी रिक्वेस्ट मान्य करायची की रिजेक्ट करायची हे अधिकार beo यांना देण्यात आलेले आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.गटशिक्षणाधिकारी यांनी खात्री करुण ट्रान्सफर बाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहे.जोपर्यंत beo सदर रिक्वेस्ट रिजेक्ट करत नाही तोपर्यंत तो विद्यार्थी नविन कोनात्याच् शाळेला ट्रान्सफर रिक्वेस्ट करण्यासाठी उपलब्ध होऊ शकणार नाही यामुळे beo यांनी सदर काम वेळोवेळी त्वरित पूर्ण करावयाचे आहे.याठिकानी हे देखील लक्षात घ्यावे की सदर विद्याथी ट्रान्सफर करण्या बाबत जर कोणी जाणुनबुजुन चुकीची रिक्वेस्ट केली असेल तर अशा शाळाच्या मुख्यध्यापकावर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

7) आपल्या शाळेत नव्याने आलेला विद्यार्थी (मुख्यतः परराज्यातील विद्यार्थी)  हा आधीच्या जुन्या शाळेच्या सरल माहिती मध्ये भरलेला नसेल तर न विन शाळेला ट्रान्सफरची विनंती करताना  दिसणार नाही याची नोंद घ्यावी.अशा बाबतीत मुख्याध्यापकाने हे लक्षात घ्यावे की आपणास जेंव्हा नविन विद्यार्थी सरल मध्ये नव्याने नोंद करण्याची परवानगी शासन देईल तेंव्हा या नोंद न झालेल्या मुलांची माहिती त्या इयत्तेमध्ये भरवायाची आहे.तोपर्यंत नविन विद्यार्थ्यांच्या बाबतीत सरल मध्ये काहीही काम करने अपेक्षित नाही आहे याची नोंद घ्यावी

8) विद्यार्थी माहिती ऑनलाइन ट्रान्सफर केले म्हणजे TC अथवा LC किंवा शाळा सोडल्याचा दाखला देण्याची किंवा घेण्याची गरज नाही आहे असा समज चुकीच आहे.नेहमी प्रमाणे विद्यार्थ्यांना शाळा सोडन्याचा दाखला देणे अनिवार्य आहेच हे लक्षात घ्यावे.कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थांना दाखला देणे बंधनकारक आहे.सदर शाळा सोडन्याचा दाखला देताना आपल्या शाळेचा udise नंबर यानंतर दाखल्यावर नमूद करने गरजेचे आहे जेनेकरून नविन मुख्याध्याकास जुनी शाळा शोधन्याची मेहनत करावी लागणार नाही याची नोंद घ्यावी.

9)जर आपल्या शाळेत एकच विद्यार्थी माहिती दोन वेळा भरली गेली असेल तेंव्हा जी माहिती अधिक योग्य आहे तीच सलेक्ट करुन नविन शाळेला पाठवण्यात यावी.त्याच विद्यार्थयाची दूसरी माहिती पहिल्याच म्हणजे जुन्या शाळेत आहे तशी राहु द्यावी.अशा दुबार किंवा डुप्लीकेशन विद्यार्थयाची नावे delete करण्याची व्यवस्था लवकरच करण्यात येणार आहे.


10)इयत्ता  8 वी पर्यन्तचे विद्यार्थी सिस्टम द्वारे आपोआप पुढील वर्गात ट्रान्सफर केले जाणार आहे हे लक्षात घ्यावे.इयत्ता 9 वी आणि त्यानंतरच्या वर्गातील मुले हे मुख्याध्यापकाने स्वतः प्रमोट करने गरजेचे आहे.सिस्टम मध्ये अद्याप नोंद न झालेला विद्यार्थीची नोंद ही नव्याने करावयाची आहे.त्यासाठी यथावकाश लॉगिन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

11) विद्यार्थी ट्रान्सफर करण्याच्या या कामासाठी सध्या स्टूडंट पोर्टल हे *पुणे* विभागासाठी उपलब्ध करुण देण्यात येत आहे याचे नोंद घ्यावी.जर पुणे विभागातल्या शाळेत इतर विभागातील विद्यार्थी शिकण्यासाठी आलेले असतील तर अशा केस मध्ये पुणे विभागातील मुख्याध्यापक इतर विभागातील शाळांना ट्रान्सफर ची request पाठवू शकतील.जेंव्हा इतर विभागांना लॉगिन उपलब्ध करुण देण्यात येईल तेंव्हा त्या विभागातील शाळा लॉगिन उपलब्ध करुण दिल्यानंतर च्या 7 दिवसाच्या आत या रिक्वेस्ट कन्फर्म करतील याची नोंद घ्यावी.त्यानंतरच नविन शाळेमध्ये तो विद्यार्थी ट्रान्सफर होईल.

12) जर एखादी शाळा बंद पडली असेल तर अशा वेळी त्या शाळेचे विद्यार्थी ऑनलाइन ट्रान्सफर करण्याचे काम नविन शाळेने ट्रान्सफर रिक्वेस्ट केल्याच्या 7 दिवसानंतर जुन्या शाळेचे beo करतील याची सर्व beo यांनी नोंद घ्यावी ही विनंती..

13) विद्यार्थी ट्रान्सफर करने हे काम झाल्यानंतर सिस्टम मध्ये एकच विद्यार्थी दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा नोंदवला गेला असेल अशा डुप्लीकेट एंट्री काढन्याचे काम केले लवकरच सुरु केले जाणार आहे.त्यानंतर नविन विद्यार्थी नोंदणी चे काम सुरु केले जाणार आहे हे लक्षात घ्यावे..


14)भविष्यात होणाऱ्या सर्व ऑनलाइन कामासाठी स्टूडंट पोर्टल ची  माहिती खुप महत्वाची आहे.हे लक्षात घेऊन हे काम अतिशय जबाबदारीने करने गरजेचे आहे.नविन शैक्षणिक वर्षात सर्व परीक्षांच्या गुणांची नोंद स्टूडंट पोर्टल मध्ये घ्यायची असल्याने आणि वर्षाअखेरी दिल जाणारे रिजल्ट हे ऑनलाइन करावयाचे असल्याने प्रत्येक विद्यार्थी सिस्टम मध्ये अचूक नोंद असने गरजेचे आहे.हे लक्षात घेऊन सदर काम वेळेत आणि अचूक करुण घ्यावे जेणेकरून भविष्यात आपली गैरसोय होणार नाही.

7 comments:

 1. तुम्ही खूपच मार्गदर्शक गुरु आहात

  ReplyDelete
  Replies
  1. Mr bhapkar sir you have given very good information to all new teachers Mr U R Patil Nipani Talk Kagal

   Delete
  2. Mr bhapkar sir you have given very good information to all new teachers Mr U R Patil Nipani Talk Kagal

   Delete
 2. Sir csv file 2 steps complete successfully zalyavar error dakhavat asun tya khali students nave yetaat.kay karave

  ReplyDelete