WE LEARN ENGLISH ANDROID APP


शिक्षण विभाग ,जिल्हा परिषद अहमदनगर ने विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विषयाच्या भाषण संभाषण सुधारनेसाठी तयार केलेला We Learn English हा रेडियो कार्यक्रम यशस्वी झाला होता. हा कार्यक्रम रेडियो व pc वर मुलांना ऐकवने बाबत काही शाळांना भौतिक अडचणी होत्या त्यामुळे हा कार्यक्रम सर्वांपर्यंत अगदी घराघरांत पोहोचावा यासाठी आदरणीय CEO श्री रवींद्र बिनवडे साहेब व शिक्षणाधिकारी श्री अशोक कडूस साहेब यांच्या सुचनेनुसार व मार्गदर्शनानुसार याचे android App तयार केले असून या App वरुन आपण हे सर्व 84 भाग ऐकू व डाउनलोड करू शकता. आता प्रत्येक पालक सुद्धा हे App डाउनलोड करून आपल्या मुलांची  इंग्रजी विषयाची तयारी करून घेवू शकतात.

             हे App सर्वांसाठी खुले करण्यात आले.आदरणीय पालकमंत्री तथा जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री ना. राम शिंदे साहेब,यांच्या हस्ते याचे लॉन्चिंग करण्यात आले.या प्रसंगी ,ना.राम शिंदे साहेब,विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे साहेब, जि.प.अध्यक्षा सौ. मंजुषाताई गुंड ,उपाध्यक्ष  अण्णासाहेब शेलार ,सभापती नवले साहेब ,चकोर मॅडम,दिघे साहेब,जि .प.सदस्य श्री संभाजी दहतोंडे ,श्री प्रवीण घुले ,Ceo.रवींद्र बिनवडे साहेब, शिक्षणाधिकारी श्री अशोक कडूस साहेब,व इतर .WE LEARN ENGLISH हे App डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.


1 comment: