आपल्या स्मार्टफोन ला बनवा वायरलेस की बोर्ड व माऊस तेही इंटरनेट शिवाय 


 वायरलेस की बोर्ड व माऊस ने संगणकावर काम करणे खूपच आरामदायक झाले आहे ,परंतु अजूनही आपण जर  हे खरेदी केले नसेल तर हरकत नाही .आता आपल्या स्मार्टफोन ला वायरलेस की बोर्ड व माऊस मधे बदलता येते ,तेही अगदी सहजपणे.

🔵यासाठी आपल्या कॉम्प्यूटर /लॅपटॉप ला वाय फाय ची सुविधा असणे आवश्यक आहे.

⚫⚫आता आपल्या स्मार्टफोन मधील प्ले स्टोर वर जा व Mouse and Keyboard Remote हे app डाउनलोड करून घ्या.

🔴🔴 हेच app आपल्याला आपल्या ज्या कॉम्प्यूटर किंवा लॅपटॉप वर वापरायचे आहे त्यावर सुद्धा इंस्टॉल करावे लागेल.

🔵🔵यासाठी आपल्याला android-remote.com या साईट वर जावून याचा सर्वर डाउनलोड करावा लागेल. यासाठी आपल्या ब्राउज़र मधे खालील अड्रेस टाइप करा. - remote-control-collection.com/download/server/windows/

 ⚫⚫येथून आपला Remote control server डाउनलोड करा व इंस्टॉल करा.

🔴🔴आता आपल्या फोनमधील Mouse & Keyboard Remote App आणि कंप्‍यूटर मधील Remote Control Server ला रन करा. आता Mouse & Keyboard Remote App च्या मेनुमधे जा आणि Add a new Devices वर क्लीक करा. आणि आपल्या कंप्‍यूटर च्या  वायफाय ने कनेक्ट करा.

🔵🔵कनेक्‍ट झाल्यावर  रिमोट्स वर जा आणि माउस, की-बोर्ड या अायकॉन वर  क्लिक करा व वायरलेस की-बोर्ड आणि माउस चा वापर सुरु करा.

🔵🔵एकदा कनेक्ट झाल्यावर आपण इंटरनेट बंद करु शकता .हे app आपल्या कॉम्प्यूटर व फोन यामधील वायफाय कनेक्शन ने काम करते त्यामुळे यासाठी इंटरनेट आवश्यक नाही .

सौजन्य :www.ravibhapkar.in/

1 comment: