💻ही अॅप्स तुमच्याकडे आहेत का?


 टेक्नोकांत
भारतात सुमारे १६ कोटी स्मार्टफोन युजर्स आहेत. तसेच अँड्रॉइड, विंडोज अशा सर्व प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीमची मिळून जवळपास तीस लाख अॅप्स उपलब्ध आहेत. सगळीच अॅप्स कमी-अधिक प्रमाणात उपयुक्त आहेतच. त्यापैकी काही अॅप्सची ही तोंडओळख...
ट्रू-मेसेंजर :(अँड्रॉइड)
एखादा जंक मेल इनबॉक्समधून स्पॅम फोल्डरला कशा प्रकारे आपोआप पाठवला जातो, याची तुम्हाला कल्पना असेलच. ट्रू-मेसेंजर हे अॅप वापरले, तर हीच सुविधा एसएमएसच्या बाबतीत उपलब्ध होते. त्यासाठी सुरुवातीला तुमच्या मोबाइलवर हे अॅप्लिकेशन डाउनलोड करावे लागते. त्यानंतर फोनचे डिफॉल्ट एसएमएस अॅप म्हणून हे अॅप्लिकेशन ठेवावे लागते आणि त्यातील काही प्रकारचे एसएमएस 'स्पॅम' म्हणून 'मार्क' करावे लागतात. कालांतराने जंक मेसेज कोणते ते अॅपला आपोआपच कळेल आणि ते एसएमएस रिसिव्ह झाल्यानंतर लगेचच स्पॅम फोल्डरमध्येच जातील. तुम्ही स्वतःही हेच काम करू शकता, तसेच चुकून स्पॅममध्ये गेलेला उपयुक्त मेसेज तुमच्या इनबॉक्समध्येही पाठवू शकता. पाठवलेला मेसेज थांबवण्याची पाच सेकंदांपर्यंतची क्षमताही हे अॅप 'अनसेंड' बटणाच्या माध्यमातून देते. तसेच 'ट्रू-कॉलर'च्या टीमनेच हे अॅप बनवलेले असल्याने अज्ञात नंबरवरून आलेला मेसेज पाठवणाऱ्याचे नावही आपल्याला कळू शकते. अर्थात, त्यामुळे तुमचे नावही या अॅपच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचते, याची मनाशी खूणगाठ बांधायला हवी.
स्मार्टस्पेंड्स :(अँड्रॉइड)
तुमचा जमा-खर्चाचा हिशेब व्यवस्थित राखण्यासाठी शिस्तीची आवश्यकता असते. त्याकामी मदत करणारे एक अत्यंत उपयुक्त अॅप्लिकेशन म्हणजे स्मार्टस्पेंड्स. तुमच्या जमा-खर्चाचा हिशेब आपोआप राखण्याचे काम हे अॅप करते. तुमची बँक, ऑनलाइन रिटेलर्स, क्रेडिट कार्ड, व्यापारी यांच्याकडून तुमच्या मोबाइलवर येणारे मेसेज हे अॅप्लिकेशन वाचते. (म्हणजे त्यातील खर्च किंवा उत्पन्नाशी निगडीत आकडे वाचते. तुमची बँकेची कोणतीही गोपनीय माहिती किंवा पासवर्ड हे अॅप विचारत नाही.) त्या मेसेजच्या स्वरूपानुसार संबंधित रकमेचे आपोआप जमा किंवा खर्चाच्या प्रकारात वर्गीकरण केले जाते. खर्च असेल, तर तो एंटरटेन्मेंट, ग्रोसरी, बिल्स अशा वेगवेगळ्या स्वरूपात वर्गीकृत केला जातो. त्यामुळे तुम्ही आठवडाभरात किंवा महिन्यात कशासाठी किती खर्च केला, हे आपोआप तुम्हाला पाहायला मिळते. त्याचे चार्टही पाहता येतात. बिल भरण्याचे रिमाइंडर लावता येतात. तुमच्याकडे असलेल्या कोणत्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर कोठे एखादी ऑफर किंवा डिस्काउंट असेल, तर त्याचीही माहिती दिली जाते. त्यामुळे तुमचे पैसे वाचू शकतात. अर्थात यात तुम्हाला तुमच्या रिसिट फोटो काढून जोडता येत नाहीत. त्यासाठी तुम्हाला 'वॉलनट' हे अॅप उपयोगी ठरू शकते.
इनशॉर्ट्स : (अँड्रॉइड, आयओएस)
तुम्हाला वेबसाइट किंवा वृत्तपत्रांतील बातम्या वाचणे शक्य नसेल, तर इनशॉर्ट्स हे अॅप जरूर वापरा. हे अॅप भारतीय वाचकांसाठी दखल घेण्यासारख्या बातम्या केवळ ६० किंवा त्याहून कमी शब्दांत उपलब्ध करून देते. त्यासाठी त्यांनी संपादकांची स्वतंत्र टीम नेमली आहे. नेमकी वस्तुस्थिती, घटनेचा कालावधी एवढीच माहिती वाचता येते. अधिक माहिती हवी असेल, तर पूर्ण मोठे आर्टिकलही उपलब्ध असते. नको असेल, तर पुढची बातमी वाचण्यासाठी आपण स्वाइप करू शकतो. इंग्रजी आणि हिंदी भाषांतील बातम्या येथे उपलब्ध असतात. मराठी, बांगला, गुजराती, मल्याळम, पंजाबी, ऊर्दू, इंग्रजी आणि हिंदी या भाषांतील वेगवेगळ्या स्रोतांतील बातम्या वाचण्यासाठी डेलीहंट (आधीचे न्यूजहंट) हेही अॅप चांगले आहे.
हेप्टिक :(अँड्रॉइड, आयओएस)
हे अॅप्लिकेशन म्हणजे तुमचा जणू पर्सनल असिस्टंटच आहे. तुम्हाला हवी असलेली माहिती तुम्ही या अॅपला विचारू शकता. त्यासाठी काहीही टाइप करण्याची गरज लागत नाही. तुम्हाला मुंबईहून कूर्गला कसे जायचे हे विचारायचे असेल किंवा फ्रिज दुरुस्तीसाठी स्थानिक तंत्रज्ञ शोधायचा असेल, तर यापैकी कोणतेही काम तुम्ही 'हेप्टिक'ला विचारू शकता.
टॅक्सी : (अँड्रॉइड)
तुम्ही असलेल्या ठिकाणापासून सर्वांत जवळ असलेली आणि कमीत कमी दरात उपलब्ध असलेल्या टॅक्सीची माहिती हे अॅप्लिकेशन देते. उबर, ओला कॅब्ज, टॅक्सी फॉर शुअर यांसारख्या सेवांची माहिती ट्रॅक करून तुम्हाला एकत्रित माहिती पुरवली जाते. त्यामुळे सर्वांत जवळ आणि सर्वांत स्वस्त अशा दोन कॉलममध्ये टॅक्सीची माहिती पुरवली जाते. प्रवासाला लागणारा वेळही कळतो. दिल्ली, मुंबई, पुणे, गोवा, बेंगळुरू, कोलकाता, कोची, भोपाळ, चंडीगड, सुरत अशा ५२ शहरांत हे अॅप्लिकेशन वापरता येते.
पिनकोड : (अँड्रॉइड)
देशांतर्गत पिनकोड, एसटीडी कोड नंबर, वाहनांचे नंबर, बँक आयएफएससी कोड, विविध कंपन्यांचे टोल फ्री क्रमांक, पीएनआर स्टेटस अशा वेगवेगळ्या प्रकारचे क्रमांक आपण या अॅप्लिकेशनच्या साह्याने शोधू शकता.
हेल्दीफाय मी : (अँड्रॉइड, आयओएस)
तुम्ही सेवन केलेल्या कॅलरींचा हिशेब ठेवण्याचे काम हे अॅप्लिकेशन करते. तुमची उंची, वय आणि वजनाची माहिती अॅपमध्ये भरावी लागते. त्यानंतर तुम्ही खाल्लेल्या पदार्थाचे नाव त्यात टाकले, की किती कॅलरी तुमच्या पोटात गेले, याची माहिती मिळते. तुम्हाला किती कॅलरी खाणे गरजेचे आहे, हेही त्यात दिसते. तुमची जीवनशैली आरोग्यपूर्ण बनवण्याच्या दृष्टीने व्यायाम सुचवण्याचे कामही हे अॅप करते.
रेलयात्री : (अँड्रॉइड, आयओएस)
तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल, तर संबंधित सर्व प्रकारची माहिती रेलयात्री या अॅपवर उपलब्ध आहे. पीएनआर स्टेटसपासून रेल्वे नकाशावर रिअल टाइम ट्रॅक करण्यापर्यंत अनेक गोष्टी तुम्ही करू शकता. रेल्वेकडून प्रसिद्ध होणारी अधिकृत निवेदने, भारतातील रेल्वेची सगळी वेळापत्रके, बर्थ पोझिशन आणि कोच लेआउट, सीट अव्हेलॅबिलिटी, टॅक्सी किंवा फूड बुकिंग अशा अनेक सेवांची माहिती त्यात मिळते. मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, कोलकाता, चेन्नई यांसारख्या शहरांतील
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

No comments:

Post a comment