Saturday, 19 December 2015

महाराष्ट्र अॅडमिन पॅनल आयोजित ऑनलाइन प्रश्नमंजुषा दिनांक 20/12/2015


इयत्ता दूसरी भाषा ऑनलाइन टेस्ट 20/12/2015


आपणास इतर इयत्ता च्या विषयवार ऑनलाइन टेस्ट सोडवायच्या असतील तर डावीकडील ऑनलाइन टेस्ट या बटनावर क्लीक करा .
मुलांच्या मनोरंजनाकरिता मी तयार केलेले Colour World व Magic Alphabets हे app डाउनलोड करण्यासाठी खालील इमेज वर क्लीक करा.
 colour world.   

Magic Alphabets


TET परीक्षा 2016 चे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील इमेज वर क्लीक करा.

IGNOU चा B.ED चा रिजल्ट पाहण्यासाठी खालील इमेज वर क्लीक करा.


इयत्ता दूसरी भाषा ऑनलाइन टेस्ट 20/12/2015


इयत्ता 2 री भाषा ऑनलाइन टेस्ट 20/12/2015

प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरादाखल चार पर्याय दिले आहेत ,त्यापैकी योग्य पर्यायावर क्लीक करा.सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर निकाल पाहण्यासाठी येथे क्लीक करा या बटनावर क्लीक करून आपला निकाल ऑनलाइन पहा.

निर्मिती :रवि भापकर ,उपा.जि.प.प्राथ. शाळा पारेवाडी ता.जामखेड जिल्हा अहमदनगर

  1. पुढील वाक्यातील नाम ओळखा . विजय हुशार व प्रामाणिक आहे .

  2. हुशार
    प्रामाणिक
    विजय
    आहे

  3. खालील वाक्याचा काळ ओळखा .समीर पुस्तक वाचतो.

  4. भुतकाळ
    वर्तमानकाळ
    भविष्यकाळ
    संध्याकाळ

  5. हत्तिवर ताबा ठेवण्यासाठी माहुताकडे ..........असतो.

  6. भाला
    अंकुश
    बाण
    खंजीर

  7. जसा ताराकांचा चमचमाट ,तसा ढगांचा ..........

  8. गड़गडाट
    खड़खडाट
    छनछनाट
    कड़कडाट

  9. खालील पर्यायांतून अनेकवचनी शब्दाचा पर्याय शोधा .

  10. लढाई
    बाई
    सूई
    गायी

  11. 'पाडस' हे पिल्लू कोणाचे ?

  12. हत्ती
    सिंह
    हरिण
    वाघ

  13. खालील पैकी कोणता महीना हिवाळा ऋतुतिल आहे ?

  14. मार्च
    जून
    जानेवारी
    सप्टेंबर

  15. 'खंत वाटने' या वाकप्रचारचा अर्थ खालीलपैकी कोणता ?

  16. वाईट वाटणे
    त्रास देणे
    आनंद होणे
    फजीती होणे

  17. खालील पर्यायातील नपुसकलिंगी पर्याय ओळखा .

  18. छत्री
    मित्र
    रात्र
    चित्र

  19. मोर या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द खालीलपैकी कोणता ?

  20. मोरनी
    मोरी
    लांडोर
    मोरीण

धन्यवाद.......!

Tuesday, 15 December 2015

माझ्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची सातारा जिल्ह्यातील साप्ताहिक "गुरुजन एकता " ने घेतलेली दखल .


Tuesday, 8 December 2015

इयत्ता तिसरी भाषा ऑनलाइन टेस्ट 08/12/2015

आपणास इतर इयत्ता च्या विषयवार ऑनलाइन टेस्ट सोडवायच्या असतील तर डावीकडील ऑनलाइन टेस्ट या बटनावर क्लीक करा .
इयत्ता तिसरी भाषा स्पर्धा परीक्षा ऑनलाइन टेस्ट दिनांक 08/12/2015
नमस्कार मित्रांनो इयत्ता तिसरी साठी नवीन प्रकारे ऑनलाइन स्पर्धा परीक्षा टेस्ट खाली दिली आहे .आपण Begin Quiz वर क्लीक करून परीक्षा सुरुवात करा .परिक्षेसाठी 15 मिनिटे वेळ असेल .परीक्षा संपल्यानंतर आपला निकाल आपल्याला लगेचच दिसेल. संकल्पना व निर्मिती: रवि भापकर ,उपा.जि.प.प्राथ.शाळा पारेवाडी ता.जामखेड जिल्हा अहमदनगर .फोन :9423751727/9404811728
Quiz created by Ravi Bhapkar

Sunday, 6 December 2015

महाराष्ट्र अॅडमिन पॅनल शिक्षकांसाठी सामान्यज्ञान स्पर्धा दिनांक :06/12/2015

स्पर्धेत विजयी प्रथम 10 नंबर ची नावे संकेतस्थळावर दिसन्याची सोय केली आहे.उद्या ही नावे पोस्ट द्वारे प्रसिद्ध केलि जातील.

Monday, 26 October 2015

इयत्ता दूसरी भाषा ऑनलाइन टेस्ट

महाराष्ट्र अॅडमिन पॅनल आयोजित ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा टेस्ट रात्री ठीक 8:00वाजता या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

आपणास इतर इयत्ता च्या विषयवार ऑनलाइन टेस्ट सोडवायाच्या असतील डावीकडील ऑनलाइन टेस्ट या बटनावर क्लीक करा .



इयत्ता 2 री भाषा ऑनलाइन टेस्ट

खाली दहा प्रश्नांची ऑनलाइन टेस्ट दिली आहे .प्रश्न वाचून बरोबर उत्तरापुढिल गोलामधे टिक मार्क करा .सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर " निकाल पाहण्यासाठी येथे क्लीक करा " या बटनावर क्लीक करून आपला निकाल ऑनलाइन पहा ..!!

निर्मिती :रवि भापकर ,उपा.जि.प.प्राथ .शाळा पारेवाडी ता.जामखेड जिल्हा अहमदनगर

  1. खालीलपैकी स्रीलिंगी शब्दाचा पर्याय शोधा .

  2. वार
    दार
    तार
    भार

  3. सर्वनाम ओळखा. ही सुमारे दीडशे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे .

  4. आहे
    ही
    सुमारे
    गोष्ट

  5. पाकळी या शब्दाचा अनेकवचनी शब्द पर्यायातून शोधा .

  6. पाकळे
    पाकळी
    पाकळ्या
    पाकोळ्या

  7. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. वडाचे खूप मोठे झाड होते.

  8. होते
    खूप
    वड
    झाड

  9. विरुधार्थी शब्द सांगा. प्रकाश × .............

  10. उजेड
    सकाळ
    दिवस
    अंधार

  11. "घर"या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा .

  12. सदन
    वदन
    वंदन
    नंदन

  13. वडिलांना पत्र लिहिताना कोणता मायना लिहाल ?

  14. तिर्थरूप
    चिरंजीव
    महोदय
    आदरणीय

  15. "पाण्यात राहणारा" या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द शोधा .

  16. भूचर
    उभयचर
    जलचर
    सागर

  17. पक्षांच्या समुहाला काय म्हणतात .

  18. काफिला
    कळप
    पुंजका
    थवा

  19. वाघिणीच्या पिल्लाला काय म्हणतात.

  20. तटटू
    शिंगरु
    बछडा
    छावा

इतर इयत्ता च्या विषयवार ऑनलाइन टेस्ट सोडविन्यासाठी वर दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन टेस्ट या टॅबवर क्लीक करून मोफत ऑनलाइन टेस्ट सोडविन्याचा सराव करा ......धन्यवाद..!!!

Tuesday, 13 October 2015

इयत्ता चौथी गणित ऑनलाइन प्रज्ञाशोध परीक्षा 3

आणखी इतर इयत्ता च्या ऑनलाइन टेस्ट सोडविन्यासाठी डावीकडे दिलेल्या ऑनलाइन टेस्ट या टॅब वर क्लीक करा नमस्कार मित्रांनो आज आपण वेळेवर आधारित ऑनलाइन टेस्ट सोडवीणार आहोत .यामधे 15प्रश्नांसाठी 20 मिनिटे वेळ दिलेली आहे .सुरुवातीला प्रश्न "मंजुषा सुरु करण्यासाठी येथे क्लीक करा " या बटनावर क्लीक करा .log in ऑप्शन आल्यास log in करून टेस्ट दया .log in करून टेस्ट दिल्यास प्रत्येक प्रश्नास 5 सेकंद जास्त मिळतील व तुमचा स्कोर ऑनस्क्रीन लिस्ट मधे दिसेल .तुम्हाला log in न करता टेस्ट द्यायची असेल तर त्या खाली दिलेल्या without log in पर्यायावर क्लीक करा .

Monday, 12 October 2015

इयत्ता तिसरी इंग्रजी ऑनलाइन टेस्ट


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरी इंग्रजी या विषयाची ऑनलाइन टेस्ट एका नव्या पद्धतीने सोडवीणार आहोत ,यामधे प्रथम आपल्याला log in हे पेज दिसत आहे ते आपल्या बोटाने /कर्सर ने डावीकडे स्क्रॉल करा .आता आपणाला रजिस्टर फॉर्म दिसेल त्यामधे आपले नाव टाका व 1234 अथवा आपणास योग्य तो पासवर्ड टाका व sign up या बटनावर क्लीक करा .आता रजिस्टर केल्यानंतर तो पासवर्ड व user name(रजिस्टर करताना निवडलेले)टाका व log in बटनावर क्लीक करा यामुळे मुलांना sign up व log in या संकल्पना सुद्धा समजन्यास मदत होईल .आपल्यापुढे start बटन ओपन होईल .त्यावर क्लीक करून आपण ऑनलाइन टेस्ट देवू शकता.आपले उत्तर चूक की बरोबर हे लगेच आपणाला कळेल .प्रत्येक प्रश्न सोड्विल्यावर continueया बटनावर क्लीक करत चला .लक्षात ठेवा ही 10 प्रश्नांची टेस्ट सोडविन्यास आपल्याकडे फ़क्त 10 मिनिट आहेत .सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर आपणास आपला संपूर्ण निकाल कळेल.नवीन टेस्ट सोडविन्यास आपणास शुभेछ्या ...!

Thursday, 8 October 2015

इयत्ता तिसरी प्रज्ञाशोध ऑनलाइन टेस्ट

नमस्कार मित्रांनो आज आपण वेळेवर आधारित ऑनलाइन टेस्ट सोडवीणार आहोत .यामधे 10 प्रश्नांसाठी 10 मिनिटे वेळ दिलेली आहे .सुरुवातीला Start Quiz या बटनावर क्लीक करा .log in ऑप्शन आल्यास log in करून टेस्ट दया .log in करून टेस्ट दिल्यास प्रत्येक प्रश्नास 5 सेकंद जास्त मिळतील व तुमचा स्कोर ऑनस्क्रीन लिस्ट मधे दिसेल .तुम्हाला log in न करता टेस्ट द्यायची असेल तर खाली दिलेल्या without log in पर्यायावर क्लीक करा .

Friday, 2 October 2015

इयत्ता चौथी गणित प्रज्ञाशोध परीक्षा ऑनलाइन टेस्ट 2


प्रगत शैक्षणिक गणित प्रश्नसंच

तंत्रस्नेही शिक्षक नोंदणी (SCERT)

प्रज्ञाशोध परीक्षा ऑनलाइन टेस्ट

ऑफलाइन टेस्ट
इयत्ता चौथी गणित प्रज्ञाशोध ऑनलाइन टेस्ट 2

इयत्ता 4 थी गणित प्रज्ञाशोध परीक्षा अभ्यासक्रम आधारीत ऑनलाइन टेस्ट भाग 2

इयत्ता 4 थी गणित प्रज्ञाशोध परीक्षा अभ्यासक्रम आधारीत ऑनलाइन टेस्ट
भाग 2

  1. 4 शतक × 9दशक=किती ?

  2. 372
    37200
    3720
    36000

  3. 90000+7+800+9000 या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या कोणती ?

  4. 99807
    99987
    90987
    99870

  5. 75412 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हांत कशी लिहाल ?

  6. 75412
    ७५५१२
    ७५१४२
    ७५४१२

  7. 8 × 9 + 12 - 12 × 7= ?

  8. 504
    72
    8
    0

  9. 54032 -43021=?

  10. 11101
    11011
    97053
    11111

  11. एका चौरसाची परिमिती 28 सेमी आहे ,तर त्या चौरासाच्या एका बाजूची लांबी किती ?

  12. 56 सेमि
    112 सेमी
    14 सेमी
    7 सेमी

  13. 55000मिली + 15000 = ?

  14. 700 लीटर
    70 लीटर
    70000लीटर
    40 लीटर

  15. 7 मुलांना 693 रुपये सारखे वाटायचे आहेत,तर प्रत्येकाला किती रुपये मिळतील ?

  16. 90 रुपये
    99 रुपये
    91 रुपये
    63 रुपये

  17. 77 नंतर येणाऱ्या 9 व्या समसंख्येत 9 मिळवले तर उत्तर किती येईल ?

  18. 103
    94
    101
    105

  19. 'त्रेचाळीस हजार एकोणसाठ ' ही संख्या अंकात कशी लिहाल ?

  20. 43069
    43049
    43059
    430059

धन्यवाद...!

Wednesday, 23 September 2015

इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षा अभ्यासक्रमावर आधारित ऑनलाइन टेस्ट

इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षा अभ्यासक्रम ऑनलाइन प्रश्नमंजुषा

इयत्ता चौथी भाषा प्रज्ञाशोध परीक्षा अभ्यासक्रमावरआधारीत ऑनलाइन टेस्ट

इयत्ता चौथीच्या प्रज्ञाशोध परीक्षा अभ्यासक्रमावर आधारित ऑनलाइन टेस्ट
  1. हंसाचा कलरव ,तसा भुंग्यांचा .......

  2. केकाराव
    केकावली
    भुभु:कार
    गुंजारव

  3. सुबक या शब्दाचा विरुधार्थी शब्द पर्यायातूनन शोधा.

  4. सुंदर
    बेढब
    सुरेल
    अबक

  5. आंब्याच्या झाडांची .........असते .

  6. दाटी
    गाथन
    अढी
    राई

  7. खलिलपैकी चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा.

  8. राष्ट्रिय प्राणी - सिंह
    राष्ट्रिय ध्वज- तिरंगा
    राष्ट्रिय फूल - कमळ
    राष्ट्रिय पक्षी - मोर

  9. खालील शब्दापैकी जोडशब्द नसलेला शब्द कोणता ?

  10. सोक्षमोक्ष
    साफसफाई
    सागरवाट
    दगडधोंडा

  11. 'नदी ' या शब्दाचा समानार्थी शब्द् पर्यायातून शोधा.

  12. नाला
    ओढ़ा
    कविता
    सरिता

  13. "णे ,ख ,ळ, व या अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो ?

  14. वळवणे
    खेळवणे
    खळवणे
    खवळणे

  15. चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा.

  16. गवताची - पेंढी
    विमानांचा - वैमानिक
    किल्ल्यांचा -जुडगा
    हरीणांचा -कळप

  17. रामरावांच्या घरी चार ........आहेत.

  18. गाया
    गाय
    गाई
    सर्व पर्याय बरोबर

  19. खालीलपैकी भूतकाळी वाक्य कोणते ?

  20. मी शाळेत जाणार आहे.
    मी शाळेत जात आहे.
    मी शाळेत गेलो होतो.
    मी शाळेत जाणार नाही.

धनयवाद ....!

Saturday, 19 September 2015

इयत्ता तिसरी प्रज्ञा शोध परीक्षा ऑनलाइन टेस्ट

इयत्ता तिसरी प्रज्ञाशोध परीक्षा ऑनलाइन प्रश्नमंजुषा

इयत्ता 3 री प्रज्ञाशोध परीक्षा अभ्यासक्रम आधारीत ऑनलाइन टेस्ट

इयत्ता तिसरी ऑनलाइन टेस्ट
विषय :परिसर अभ्यास
  1. शेतात जमिनिखाली कोण राहतात ?

  2. घुशी आणि उंदीर
    बिबटे आणि तरस
    चिमणी व कबूतरे
    नाग व शिंपी

  3. खालीलपैकी अंगमेहनातीचे काम कोणते

  4. अभ्यास करने
    चित्र काढणे
    पेटी उचलणे
    भाजी निवडणे

  5. खालीलपैकी कोणता पदार्थ भाजुन तयार करतात ?

  6. मोदक
    इडली
    ढोकळा
    भाकरी

  7. कसदार मातीमुळे वनस्पतींचे .............

  8. आयुष्य घटते
    पोषण होते
    प्रदुषण होते
    उत्पन्न घटते

  9. खालील पर्यायातूनन चुकीच्या विधानाचा पर्याय शोधा .

  10. जंगली प्राण्याना पाण्याची गरज नसते .
    जंगलातील वनस्पतींना पाण्याची गरज असते.
    पावसाचे पाणी जमिनीत मुरते.
    पाण्याचा वापर जपून करावा.

  11. आत्या कोणाला म्हणतात ?

  12. काकांच्या बायकोला
    आईच्या बहिणीला
    वडिलांच्या बहिणीला
    आजोबांच्या बहिणीला

  13. कोणत्या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली ?

  14. 15 ऑगस्ट
    1 में
    26 जानेवारी
    14 नोहेंबर

  15. 'बैंक,शिक्षक,डॉक्टर ,'हे व्यवसाय कशाशी निगडित आहेत?

  16. व्यापार
    उद्योग
    निसर्ग
    सेवा पुरविणे

  17. अमावस्या कोणत्या दिवसाला म्हणतात ?

  18. ज्या दिवशी चंद्र गोल गरगरित दिसतो
    ज्या दिवशी चंद्र दिसत नाही
    ज्या दिवशी चंद्र अर्धा दिसतो
    ज्या दिवशी चंद्राची कोर दिसते

  19. झाडाझुडपांची पाने कुरतडून खाणारा किटक कोणता ?

  20. डास
    ढेकुण
    कोळी
    सुरवंट

धन्यवाद....!

Saturday, 12 September 2015

"महाराष्ट्र शिक्षक मंच " शिक्षकांसाठी ऑनलाइन टेस्ट

महाराष्ट्र शिक्षक मंच शिक्षकांसाठी ऑनलाइन प्रश्नमंजुषा
महाराष्ट्र शिक्षक मंच ऑनलाइन प्रश्नमंजुषा
प्रत्येक प्रश्नाच्या ख़ाली उत्तराचे चार पर्याय दिले आहेत ,त्यापैकी योग्य उत्तराच्या पर्यायापुढे क्लीक करा .

  1. मुलांनो अभ्यास करा-या वाक्याचा प्रकार ओळखा.

  2. होकरार्थी
    आज्ञार्थी
    संकेतार्थी
    प्रश्नार्थी

  3. जुन्या चालीरिती प्रमाणे वागणारा-या शब्दासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.

  4. पुरोगामी
    सनातनी
    धार्मिक
    कर्मठ

  5. Find the antonym of Slavery .

  6. Bondage
    Freedom
    Grind
    Drudge

  7. A person who loves everybody.

  8. Altruiest
    Beloved
    Lover
    None of these

  9. संगणकाचे मुख्य भाग किती आहेत ?

  10. एक
    दोन
    तिन
    चार

  11. आर्य समाज कोणाच्या विरोधात आहे?

  12. धार्मिक अनुष्ठान व मूर्तिपूजा
    सती प्रथा
    ब्रम्ह समाज
    वरील सर्वांच्या

  13. महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ कोणत्या ठिकाणी आहे ?

  14. अमरावती
    निफाड
    धुळे
    कोल्हापुर

  15. स्वामी दयानंद सरस्वती चे मुळ नाव काय होते?

  16. शंकराचार्य
    मूलशंकर
    दया
    हंसराज

  17. गुगामल(मेळघाट) राष्ट्रीय उद्यान कुठे आहे ?

  18. नागपुर
    अमरावती
    ठाणे
    पुणे

  19. ऑफलाईन उपकरण म्हणजे............

  20. जे उपकरण सीपीयू ला जोडले नाही
    जे उपकरण सीपीयू ला जोडले आहे
    इनपुट आउटपुट उपकरण
    डायरेक्ट एक्सेस साठवणुक उपकरण

धन्यवाद ...!

Thursday, 10 September 2015

इयत्ता तिसरी परिसर अभ्यास ऑनलाइन टेस्ट


इयत्ता 3 री परिसर अभ्यास ऑनलाइन टेस्ट

प्रत्येक प्रश्नांच्या उत्तरादाखल चार पर्याय दिले आहेत .त्यापैकी योग्य उत्तराच्या पर्यायावर हाताने/माउस ने सिलेक्ट करा. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर निकाल पहा या बटनावर क्लीक करून आपला निकाल पहा.
  1. खालील पैकी पाळीव प्राणी कोणता ?

  2. हत्ती
    हरिण
    शेळी
    उंदीर

  3. श्वास घेण्यासाठी माशांना कशाचा उपयोग होतो ?

  4. नाक
    त्वचा
    पर
    कल्ले

  5. काही सजीव हवेत उडतात ,त्यांना काय म्हणतात ?

  6. प्राणी
    पक्षी
    जलचर
    भूचर

  7. खालील पैकी कोणाला दोन पाय असतात ?

  8. साप
    गरुड़
    हरिण
    पाल

  9. खालील पैकी कोंबडीचा निवारा कोणता ?

  10. गोठा
    घर
    खुराडे
    तबेला

  11. सूर्य दररोज कोणत्या दिशेला मावळतो ?

  12. पूर्व
    पश्चिम
    दक्षिण
    उत्तर

  13. होकायंत्रतील चुंबकसूची नेहमी कोणती दिशा दाखवते ?

  14. पूर्व -पश्चिम
    उत्तर -दक्षिण
    उत्तर - पूर्व
    पश्चिम- दक्षिण

  15. आपल्या देशाची राजधानी ........ही आहे .

  16. हैद्राबाद
    मुंबई
    नवी दिल्ली
    कलकत्ता

  17. जो काळ घडून गेला आहे ,त्यास .........म्हणतात .

  18. वर्तमानकाळ
    भूतकाळ
    भविष्यकाळ
    चालू काळ

  19. खालीलपैकी कोणता माल गावातुन शहराकडे जातो ?

  20. खेळणी
    पुस्तके
    सायकली
    भाजीपाला

धन्यवाद .......!

Monday, 7 September 2015

इयत्ता चौथी गणित ऑनलाइन टेस्ट

इयत्ता चौथी ऑनलाइन गणित टेस्ट


इयत्ता चौथी गणित ऑनलाइन टेस्ट

महाराष्ट्र शिक्षक मंच ऑनलाइन टेस्ट मधे आपले स्वागत आहे.प्रत्येक प्रश्नापुढे उत्तराचे चार पर्याय दिले आहेत त्यापैकी योग्य पर्यायापुढे आपल्या हाताने/माऊस ने सिलेक्ट करा. शेवटी निकाल पहा या बटनावर क्लीक करून आपला निकाल ऑनलाइन पहा .......

  1. काटकोनापेक्षा मोठ्या कोणाला काय म्हणतात ?

  2. लघुकोंन
    काटकोंन
    विशालकोन
    कोन

  3. विजेच्या खांबाने जमीनिशी केलेला कोन कोणता कोन असतो ?

  4. कोन
    काटकोंन
    लघुकोंन
    विशालकोन

  5. तिन हजार पाचशे सात ही संख्या अंकात कशी लिहाल ?

  6. ३०००५०७
    ३००५०७
    ३०५०७
    ३५०७

  7. २३४५ ,२३४९ ,२३४७ या संख्यांचा पुढिलपैकी बरोबर उतरता क्रम कोणता ?

  8. २३४९ ,२३४७ ,२३४५
    २३४७ ,२३४५ ,२३४९
    २३४५ ,२३४७ ,२३४९
    २३४९ ,२३४५ ,२३४७

  9. "चार हजार पाचशे छत्तीस" ही संख्या अंतरराष्ट्रीय संख्याचिंन्हात कशी लिहाल ?

  10. ४५३६
    40536
    ४०५३६
    4536

  11. संख्या मालिका पूर्ण करा . ६......१०......१४......?

  12. १२
    १८
    २०
    १५

  13. बेरीज करा. ५६४२+३२४५ =?

  14. ८८८८
    ९८८८
    ८८७७
    ८८८७

  15. ६००७ -२३४५= ?

  16. ८३५२
    ३५६२
    ३६६२
    ३६५२

  17. ४ श × ५ = ?

  18. 20
    200
    2000
    20000

  19. ४०५० ही संख्या विस्तारित रुपात कशी लिहाल ?

  20. ४००+५०
    ४०००+५०
    ४०००+५००
    ४००+५००

धन्यवाद ......!

Saturday, 5 September 2015

महाराष्ट्र शिक्षक मंच शिक्षकांसाठी ऑनलाइन प्रश्नमंजुषा


महाराष्ट्र शिक्षक मंच ऑनलाइन प्रश्नमंजुषा

  1. एडवर्ड जेन्नर यांनी कोणत्या लशीचा शोध लावला ?

  2. पोलियो
    देवी
    हिवताप
    कॉलरा

  3. जीवनसत्व बी-12 कोणत्या फळात सर्वाधिक असते ?

  4. काजू
    पपई
    सफरचंद
    कलिंगड़

  5. खालीलपैकी कोणत्या धातुंपासून ब्राॅन्झ संमिश्र तयार होते.?

  6. तांबे आणि कथिल
    तांबे आणि जस्त
    तांबे व लोह
    तांबे व पोलाद

  7. लोकसभेला एकदाही समोर ना गेलेले पंतप्रधान कोन ?

  8. मोरारजी देसाई
    लालबहादुर शास्त्री
    चौधरी चरणसिंह
    इंदिरा गांधी

  9. खालीलपैकी कोणता अधातू विद्युत वाहक आहे ?

  10. लाकुड़
    हिरा
    प्लास्टिक
    ग्रेफाइट

  11. खालीलपैकी हत्तीरोगासाठी कारणीभूत असणारी डासांची जात कोणती ?

  12. अनोफिलिस
    क्युलेक्सी
    एडिस
    प्लासमोडियम

  13. पंतप्रधान हे ____________ चे पदसिध्द अध्यक्ष असतात.

  14. योजना आयोग
    निवडणूक आयोग
    महिला आयोग
    वित्त आयोग

  15. लोकायुक्ताची निवड _________ करतो. ?

  16. राज्यपाल
    पंतप्रधान
    राज्यपाल
    मुख्यमंत्री

  17. आसाममधील काझिरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिध्द आहे ?

  18. हंगुल हरिण
    वाघ
    एकशिंगी गेंडा
    काळवीट

  19. सध्याची महाराष्ट्र विधानसभा कितवी आहे ?

  20. 11
    12
    16
    14

धन्यवाद

Thursday, 3 September 2015

इयत्ता तिसरी विषय गणित ऑनलाइन टेस्ट


इयत्ता 3 री गणित ऑनलाइन टेस्ट

प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिले आहेत त्यापैकी अचूक पर्याय निवडा.
  1. टेबलाच्या पृष्टभागाला किती कडा असतात ?

  2. एक
    दोन
    तिन
    चार

  3. ३७ ही संख्या अक्षरात कशी लिहाल ?

  4. सदवतीस
    सदतिस
    सादोतीस
    सद्दवतीस

  5. १ शतक म्हणजे किती ?

  6. १०
    १०००
    १००
    १००००

  7. संखेच्या लगतची पुढची संख्या लिहा.! २१८ ........

  8. २१६
    २१७
    २१९
    २२०

  9. दिलेल्या संख्यांचा बरोबर चढता क्रम कोणता ?? ६९ ,९ ,७०, ५९

  10. ९,७०,६९,५९
    ९,५९,६९,७०
    ७०,६९,५९,९
    ५९,६९,७०,९

  11. ४३४या संखेचे विस्तारित रूप कोणते ?

  12. ४००+३०+४
    ४०+३०+४
    ४+३०+४०
    ४+३+४

  13. ५२+३४=?

  14. ९५
    ५९
    ८६
    ६७

  15. ४५८-४४= ?

  16. ५०२
    ४१४
    ५१४
    १८

  17. ५ × ९ = ?

  18. १४
    ३६
    ४५
    ३५

  19. ४०३ + २४ = ?

  20. ६४३
    ८२३
    ६०७
    ४२७

निकाल पाहण्यासाठी निकाल पहा या बटनावर क्लीक करा .

Tuesday, 1 September 2015

इयत्ता चौथी ऑनलाइन टेस्ट


इयत्ता चौथी भाषा ऑनलाइन टेस्ट

  1. रिकामी जागा भरा . एक होती मुलगी.तिचे नाव ...........

  2. शीला
    नीला
    लीला
    सरिता

  3. लीलाला कसली हौस होती ?

  4. खोटे बोलयाची
    अभ्यास करायची
    फिरायला जायची
    खोड्या काढण्याची

  5. कोण कोणास म्हणाले ."नको बुडवू शाळा"

  6. आई _लीलाला
    माई -लीलाला
    ताई-लीलाला
    नदी-लीलाला

  7. नांदोत सूखे गरीब ........एकमतानी .रिकामी जागा भरा .

  8. जनता
    गोर
    आमीर
    लोक

  9. सरपंचानी बबलीला कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता ?

  10. पहिलो
    दूसरी
    तीसरी
    पाचवी

  11. अर्थ सांगा .रक्ताचे पाणी करणे .

  12. खूप कष्ट करने
    रक्तात पाणी ओतने
    पाण्यात रक्त ओतने
    पाणी पिणे

  13. वसतीगृहतील मुलांवर आण्णांची माया कोनाप्रमानणे होती ?

  14. बहिनीप्रमाणे
    भावाप्रमाणे
    माता -पित्याप्रमाणे
    शिक्षकाप्रमाणे

  15. वाक्प्रचाराचा अर्थ सांगा .पोटात कावळे ओरडणे.

  16. झोप लागणे
    सतत प्रयत्न करणे
    एखादी गोष्ट करायचे टाळणे
    खूप भूक लागणे

  17. धरणीला कशाचा ध्यास आहे ?

  18. धूळ पेरणीचा
    टिपुर मोत्यांचा
    चातकाचा
    हिरव्या पिसांचा

  19. मुले कोणता खेळ खेळत होती?

  20. कबड्डी
    सुरपारंबीचा
    कुस्तीचा
    शिवाशीविचा

धन्यवाद..!आपला निकाल पाहण्यासाठी खालील निकाल पहा या बटनावर क्लीक करा

Sunday, 30 August 2015

इयत्ता तिसरी भाषा ऑनलाइन टेस्ट



इयत्ता 3 री , विषय :भाषा

इयत्ता तिसरितील भाषा विषयाचे प्रश्न पर्याय स्वरुपात आपनापुढे दिलेले आहेत ,योग्य उत्तरापुढे क्लीक करून उत्तर सिलेक्ट करा.

  1. कुंदापुरचा आठवडी बाजार कधी भरायचा ?

  2. शनिवार
    रविवार

  3. शिवानी दुकानापाशी काय पहात होती ?

  4. खेळणी
    मिठाई

  5. पाऊस पडल्यावर कोण नाचू लागले ?

  6. अंगण
    मुले

  7. उत्सव या अर्थाचा शुद्ध समानार्थि शब्द कोणता ?

  8. सन
    सण

  9. म्हशीला काय चावता येत नव्हते ?

  10. कडबा
    गवत

  11. योग्य पर्याय निवडा : लाकडाची ??

  12. जुडी
    मोळी

  13. मनुलीने कशाची पाने पुस्तकात ठेवली ?

  14. वड
    पींपळ

  15. "पुंगार" शब्दाचा मराठीत योग्य शब्द सांगा ,

  16. झाडे
    फुले

  17. मुग्धाचा स्वभाव कसा होता ?

  18. खट्याळ
    अबोल

  19. रिकाम्या जागी योग्य शब्द कोणता ?. नदी ...........जावू लागते .

  20. मागेमागे
    पुढे पुढे

आपणाला ही टेस्ट आवडली असेल तर ,कमेंट बॉक्स मधे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा.

Friday, 28 August 2015

सामान्यज्ञान ऑनलाइन टेस्ट


प्रश्नमंजूषा

प्रत्येक प्रश्नाला चार अचूक पर्याय दिले आहेत.त्यातील अचूक पर्याय निवडून उत्तरावर टिकमार्क करा.

  1. महाराष्ट्राची राजधानी कोणती ??

  2. दिल्ली
    मुंबई
    पुणे
    नागपुर

  3. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ??

  4. वाघ
    सिंह
    हत्ती
    शेकरु

  5. महाराष्ट्राचा राज्याची स्थापना केव्हा झाली??

  6. 15 ऑगस्ट 1947
    1 में 1960
    26 जानेवारी 1950
    1 मे 1950

  7. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण ?

  8. पृथ्वीराज चव्हाण
    अजितदादा पवार
    देवेन्द्र फडणवीस
    पंकजा मुंडे

  9. भारताचे पंतप्रधान कोण आहेत ?

  10. लालकृष्ण आडवाणी
    नरेंद्र मोदी
    मनमोहन सिंग
    राहुल गांधी

  11. भारताचे राष्ट्रपति कोण आहेत?

  12. प्रतिभाताई पाटिल
    लालकृष्ण आडवाणी
    शरद पवार
    प्रणव मुखर्जी

  13. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती ?

  14. पुणे
    मुंबई
    नागपुर
    औरंगाबाद

  15. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

  16. पुणे
    अहमदनगर
    सोलापूर
    नासिक

  17. महाराष्ट्रात संत्री साठी कोणता जिल्हा प्रसिद्द आहे?

  18. नागपुर
    सोलापूर
    जळगाव
    पुणे

  19. महाराष्ट्रातील चिकू साठी प्रसिद्ध् ठिकाण कोणते ?

  20. वेंगुर्ला
    घोलवड
    वासई
    अलीबाग

धन्यवाद ...!

Tuesday, 25 August 2015

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र पायाभूत चाचणी भाषा प्रश्न पत्रिका स्वरुप














विज्ञानातील सोपे प्रयोग

🔎 विज्ञानातील सोपे प्रयोग 🔍
         
🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆

📡 खार्‍या पाण्याचे गोडे पाणी.

साहित्य – खारे पाणी, परात, जड भांडे, प्लॅस्टिकचा कागद, दोरी, काचेची गोटी.कृती – एक परात घ्या. परातीच्या मध्यभागी परातीपेक्षा कमी उंचीचे एक जड भांडे ठेवा. परातीत खारे पाणी (विहिरीचे मचूळ पाणी किंवा समुद्राचे, खाडीचे पाणी) भरा. आतल्या जड भांड्यापेक्षा पाण्याची पातळी कमी ठेवा. परातीवर दोरीच्या सहाय्याने एक प्लॅस्टिकचा कागद ताणून बांधा. कागदावर एक काचेची गोटी ठेवा. गोटी मध्यभागी जाऊन थांबेल आणि गोटीच्या वजनाने प्लॅस्टिकचा कागद थोडा वक्राकार होईल. हे उपकरण दिवसभर ऊन असेल अशा ठिकाणी ठेवा. पाणी तापेल, त्याची वाफ होईल, प्लॅस्टिकच्या कागदावर पाण्याच्या थेंबाच्या रुपात सांद्रिभूत होईल. कागदाच्या मध्याकडे घरंगळत जाईल. जड भांड्यात शुद्ध पाणी थेंब थेंब पडेल.पाण्याचीच वाफ होते, त्यातल्या क्षाराची होत नाही.

📡सूर्यफुलातल्या बियांची रचना.

साहित्य – सूर्यफूल, खडू.कृती – एक काढणीला आलेले सूर्यफूल घ्या. त्याच्या वाळलेल्या पाकळ्या हलके काढा. एक खडू हातात घ्या. सर्वात मधली बी शोधून काढा. त्या बीला लागून असलेली बी या दोन्हींचे मध्यबिंदू खडूने जोडा. दुसर्‍या बीला लागून असलेली एक बी अशी शोधून काढा की ती चक्राकार मांडणीत बसेल. अशा पद्धतीने सर्वात कडेच्या बी पर्यंत पोचेल असा चक्राकार कंस काढा. आता दुसरी सर्वात आतली आणि खडूची खूण नसलेली बी शोधा. तिच्यापासून सुरू होणारा आधीच्या कंसाच्या दिशेत वळणारा दुसरा कंस काढा. असे एकाच दिशेने जाणारे सर्व कंस काढा. मग विरुद्ध दिशेने जाणारे कंस काढा.५५    कंस एका दिशेचे तर ८९ कंस विरूद्ध दिशेचे येतात. या संख्या फिलोनसी मालिकेतल्या सलग संख्या आहेत.

📡रम्य गुणोत्तर

साहित्य – एक हात, पट्टी.कृती – आपल्याला हाताची लांबी मोजायची आहे. कोपरापासून मनगटापर्यंतची लांबी मोजा. नोंदवून ठेवा. (क). कोपरापासून मधल्या बोटापर्यंतची लांबी मोजा. नोदवून ठेवा. (ह). मनगटापासून मधल्या बोटापर्यंतची लांबी मोजा, नोदवून ठेवा. (ब).  ह आणि क यांचे गुणोत्तर काढा. तसेच क आणि ब यांचे गुणोत्तर काढा. दोन्हीचे उत्तर सुमारे १.६१८ येते.या गुणोत्तराला रम्य गुणोत्तर म्हणतात. एका सरळ रेषेचे दोन असमान भाग गेले की मोठा खंड आणि पूर्ण रेषा यांचे गुणोत्तर, लहान खंड आणि मोठा खंड यांच्या गुणोत्तर इतके असेल तर त्याला गम्य गुणोत्तर म्हणतात. आपला हात रम्य गुणोत्तरात असतो.

📡बसल्या बसल्या वीज.

साहित्य – प्लॅस्टिकची खुर्ची, कृत्रीम धाग्याचे कापड, एक व्यक्ती.कृती – एका व्यक्तिला एका प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसवा. एक कृत्रिम धाग्याने बनवलेला – नायलॉन, टेरिलिन, पॉलिइस्टर यांपैकी – कापडाचा मोठा तुकडा घ्या. सदरा, साडी काहीही चालेल. त्या कापडाने खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला वारा घाला. कपडा व्यक्तिच्या जवळून नेताना विजेच्या ठिणग्या पडलेल्या दिसतील. हा प्रयोग अंधारात केल्यास ठिणग्या स्पष्ट दिसतील. कधी कधी ठिणग्यांचा झटका बसतो, सावधपणे प्रयेग करा.कृत्रिम धाग्याच्या कपड्याच्या हालचालीने स्थिरविद्युत निर्माण होते. तिच्या प्रभावाने प्लॅस्टिकमध्ये प्रवर्तीत वीज तयार होते. दोन्ही विरूद्ध भाराच्या वीजा निर्भारीत होताना ठिणग्या पडतात.

📡अंगात वीज.

साहित्य – तुम्ही स्वत:कृती – तुमचा एक हात - डावखोर्‍यांनी उजवा आणि उजखोर्‍यांनी डावा – सरळ जमिनी समांतर ताणा. तो हात कोपर्‍यात दुमडा. दुसर्‍या हाताच्या मधल्या बोटाने कोपर्‍याच्या हाडाच्या टोकावर हलका झटका द्या. तुम्हाला विजेचा झटका बसलेला जाणवेल. यावरून तुमच्या अंगात वीज आहे हे सिद्ध होईल.
हाताच्या कोपर्‍याच्या हाडांजवळील - अलनर नस त्वचेच्या बरीच जवळ असते. नसांचे कार्य विजेच्या सूक्ष्म प्रवाहावर अवलंबून असते. आपल्या शरीरात पेशीत पोटॅशियम जास्त तर रक्तात सोडीयम जास्त असतो. त्यांच्यात विशिष्ट परिस्थितीत वीजभार निर्माण होतो.

📡सूर्यावरचे डाग घरात पहा

साहित्य – आरसा, कागद, कात्री, पट्टी, पेन्सिल, कंपास.कृती – एका ए4 आकाराच्या कागदावर मध्यभागी एक सेंटिमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळ कात्रीच्या सहाय्याने कापून घ्या. तो कागद एका आरशावर चिकटवा. आरसा घराबाहेर उन्हात ठेवा. वर्तुळाकार भोकातून येणारा कवडसा भिंतीवर पडू द्या. आरसा भितीपासून दूर असेल तेवढा कवडसा मोठा पडेल. कवडसा वगळता बाकी येणारे उजेड कमीतकमी करा. कवडशामध्ये काही काळसर ठिपके दिसतील ते सूर्यावरचे डाग आहेत. कवडशात ढगही हालताना दिसतील. आरशावरून परावर्तित झालेला सूर्यप्रकाश कमी प्रखर होतो, तो भिंतीवर पडून परावर्तीत होताना त्याची प्रखरता आणखी कमी होते आणि बारकावे दिसायला लागतात.

📡संत्र्याची आतषबाजी

साहित्य – मेणबत्ती, काड्यापेटी, संत्रीकृती – संत्र्याची साल सोला. आतल्या फोडी खाऊ शकता. एक मेणबत्ती काड्यापेटीने पेटवा. तिची ज्योत स्थिर राहू द्या. संत्र्याच्या सालीचा एक तुकडा अंगठा आणि मधले बोट यांच्या पकडीत धरा. मेणबत्तीच्या ज्योतीजवळ नेऊन साल उभ्यात दाबा. सालीतून उडालेले शितोंडे प्रखर उजेड पाडत पेटतील.संत्र्याच्या सालात ज्वालाग्राही तेल असते. दाबल्यावर त्याचे तुषार उडतात. मेणबत्तीच्या ज्योतिमुळे पेटतात व संपून विझतात.

📡मऊ काजू करा टणक

साहित्य – मऊ पडलेले काजू, बदाम, पिस्ते, फ्रिजकृती – मऊ पडलेले काजू, बदाम, पिस्ते वगैरे तेलबिया खायला मजा येत नाही. ते पूर्ववत कडक करण्यासाठी मऊ सुकामेवा एका बशीत पसरून ठेवा. ती बशी फ्रिजच्या आत ठेवा. काही तासांनी बशी बाहेर काढून पहा सुकामेवा पुन्हा टणक झालेला असेल.पाणी आत शिरल्याने सुकामेवा मऊ होतो. फ्रिजमध्ये हवा गार आणि कोरडी असते. कोरड्या हवेमुऴे सुक्यामेव्यातला दमटपणा बाहेर फेकला जातो.

📡आम्लतादर्शक पट्टी

साहित्य – साधा वहीचा कागद, सदाफुलीची फुले, कात्री, लिंबू, सोडा.कृती – साधा – गुळगुळीत नसलेला – वहीचा कागद घ्या. कागदावर शाई फुटत असेल तर तो या प्रयोगासाठी उत्तम कागद. सदाफुलीच्या फुलाच्या पाकळ्या कागदावर चोळून कागद रंगीत करा. कागद ओलसर झाला तरी चालेल. कागद कडक होईपर्यंत वाळवा. यातला एक तुकडा घेऊन त्यावर लिंबाच्या रसाचा थेंब टाका. कोणता रंग येतो? अशाच दुसर्‍या तुकड्यावर ओलसर करून सोड्याची चिमूट टाका. कोणता रंग येतो पहा. दोन रंग वेगळे आले की आपली आम्लतादर्शक पट्टी तयार झाली. न झाल्यास आणखी पाकळ्या चोळून कागद वाळवा. कात्रीने कागदाच्या अर्धा सेंटिमीटर रुंदीच्या पट्ट्या करा.सदाफुलीच्या पाकळीतील रंगद्रव्य आम्लतेनुसार रंग बदलते.

📡हैड्रोजन क्लोराईड वायू बनवा.

साहित्य – मीठ, खाण्याचा सोडा, छोटा खलबत्ता, चमचा, आम्लतादर्शक पट्टी, अमोनिया.कृती – छोट्या खलबत्त्यात एक चमचा कोरडे मीठ घाला, तसेच चमचाभर खाण्याचा सोडा घाला. बत्त्याने हे मिश्रण खलत रहा. आंबूस वास येईल. त्यावेळी ओलसर आम्लतादर्शक पट्टी खलाजवळ आणा तिचा रंग बदलेल. अमोनियाच्या द्रावणाचा एक थेंब चमच्यावर घ्या. तो खलाजवळ आणल्यास त्यातून नवसागराचा पांढरा धूर आलेला दिसेल.मीठ आणि खाण्याचा सोडा कोरड्यातच खलला की त्यातून हैड्रोजन क्लोराईड वायू मुक्त होतो व खलात धुण्याचा सोडा तयार होतो. अमोनियाच्या द्रावणातून बाहेर पडणारा अमोनिया वायू हैड्रोजन क्लोराईड वायू बरोबर संयोग पावून नवसागर धूर स्वरूपात तयार होतो.
❄❄❄❄❄❄❄❄❄
स्त्रोत : मराठी विज्ञान विकास परिषद
picasion.com

एकूण ब्लॉगभेटी

ONLINE USERS